शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

प्रभू रामांनी आराधना केलेले धुपेश्वर येथील शिवलिंग!

By admin | Updated: December 30, 2016 18:11 IST

धुपेश्वर या तीर्थक्षेत्राचा गत दोन वर्षांपासून जीर्णोद्धाराचे कार्य हे एका भोपाळस्थित भाविकाकडून स्वयंस्फूर्तीने केले जात आहे.

ऑनलाइन लोकमतमलकापूर, दि. 30 - संपूर्ण मलकापूर शहराची तृष्णा भागवित असलेल्या पूर्णामायीच्या तिरावर वसलेल्या धुपेश्वर या तीर्थक्षेत्राचा गत दोन वर्षांपासून जीर्णोद्धाराचे कार्य हे एका भोपाळस्थित भाविकाकडून स्वयंस्फूर्तीने केले जात आहे. या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी आराधना केल्यामुळे या तीर्थस्थळाला वेगळेच महत्व आहे. मराठवाडा, खान्देश व विदर्भाचा मध्यबिंदू असलेल्या मलकापूर तालुक्यातील मौजे हरसोडा ग्रामपंचायत अंतर्गत धुपेश्वर या तीर्थक्षेत्राचा परिसर असून या तीनही भागातील अनेक भाविक भक्तांची या तीर्थक्षेत्रावर मोठी श्रद्धा आहे. या भागातील भाविक मोठ्या संख्येत या तीर्थक्षेत्राशी जुळले आहेत. वनवासी जात असताना प्रभू रामचंद्र स्थापित शिवलिंग येथे असून, याकाळी रामाने येथे आराधना केली आहे. घनदाट अरण्याचा हा परिसर असताना येथे श्रीविठ्ठल लहरी पुजारी बाबांनी शिवलिंगाची पुजा व देखभाल मनोभावे केली. या बाबांचे अनेक चमत्कार त्या काळी भाविकांना प्रत्यक्ष अनुभवास आले.बाबांमुळे या तीर्थक्षेत्राची महती वाढली. दरम्यान बोदवड तालुक्यातील नाडगाव येथील सदगृहस्थ रावसाहेब बाबुराव पाटील यांनी प्रथम या मंदिराचा सन १९३९ साली जीर्णोद्धार केला. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे ते सदगृहस्थ काका होते. पुढे सन १९४६ साली मंदिराचे श्रीविठ्ठल लहरी पुजारी बाबांनी मंदिराजवळ जिवंत समाधी घेतली. त्यांच्या पश्चात हभप रामभाऊ पुजारी बाबांनी मंदिराचे सेवाकार्य जोपासले. सन २०१४ मध्ये २९ जुलै रोजी रामभाऊ महाराजांचे दु:खद निधन झाले. त्यानंतर आता मंदिराच्या सेवाकार्याची जबाबदारी श्री पुंजाजी महाराज रायपुरे हे सांभाळीत आहेत.श्रावण महिन्यात दर सोमवारी या ठिकाणी भाविक भक्तांची मोठी गर्दी उसळते. मनोकामना पूर्ण झालेल्या भक्तांकडून रोडग्यांचा भंडाराही होतो. सद्यस्थितीत संस्थानचे अध्यक्षपद अ‍ॅड. महादेवसिंह रावळ यांचेकडे असून ते नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ यांचे वडील आहेत. तर व्यवस्थापक म्हणून तेजराव रायपुरे हे जबाबदारी सांभाळीत आहेत. गत दोन वर्षांपासून त्या भोपाळस्थित भाविकांच्या पुढाकारातून व आर्थिक पाठबळातून मंदिराला भव्यदिव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. या परिसरात माजी नगराध्यक्ष नारायणदास निहलाणी यांनी त्यांच्या मातोश्री स्मृतिप्रीत्यर्थ भक्तांकरिता थंड व शुद्ध पेयजलाची यंत्रणा उभारून दिली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोषराव रायपुरे यांनी तत्कालीन ग्रामविकास मंत्री जयंतराव पाटील यांचे माध्यमातून या तीर्थक्षेत्राच्या विकासाकरीता १ कोटी ३५ लाख रूपयांचा निधी मिळवून या निधीतून ५०-५० लाखांचे दोन भक्तनिवास, २५ लाखांचे स्नानगृह व स्वच्छतागृहे तसेच १६ लाखाची पाण्याची टाकी आदी सुविधांची निर्मिती केली आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत १० व १२ लक्ष रुपयांच्या वाहन तळाची निर्मिती करीत संतोषराव रायपुरे यांनी नदीवर घाट निर्मिती, परिसरात विद्युत काम व पेव्हर ब्लॉक अशा विविध दोन कोटी रुपयांच्या विकासकामांचा प्रस्तावसुद्धा त्यांनी जि.प. मार्फत केंद्रीय ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचेकडे दाखल केला आहे हे विशेष.