शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
4
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
5
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
6
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
7
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
8
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
9
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
10
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
11
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
12
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
13
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
14
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
15
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
16
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
17
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
18
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
19
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
20
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!

शिवाजी कोळीला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी

By admin | Updated: December 8, 2015 02:32 IST

किडनी तस्करी प्रकरणी सलग तिसर्‍या दिवशीही नागपूरच्या डॉक्टरांची चौकशी.

अकोला: किडनी तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी सांगली जिल्ह्यातील शिवाजी कोळी याला १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी दिले. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी देवेंद्र सिरसाट व आनंद जाधव यांना अटक केल्यानंतर, त्यांच्या चौकशीदरम्यान शिवाजी कोळी, विनोद पवार यांच्यासह नागपूर, औरंगाबाद येथील काही डॉक्टरांची नावे समोर आली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून रविवारी दुपारी बुलडाणा जिल्ह्यातील मांडवा येथील विनोद पवार याला आणि त्याच रात्री सांगलीच्या शिवाजी कोळी याला अटक केली. विनोद पवारला ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सोमवारी दुपारी शिवाजी कोळी याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. शिवाजी कोळी हा किडनी तस्करीचे रॅकेट चालवत असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. या रॅकेटमध्ये काही डॉक्टरांचा समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो कुणाच्या माध्यमातून हे रॅकेट चालवतो आणि त्याने आतापर्यंत किती लोकांच्या किडन्या काढल्या आहेत, याची माहिती त्याच्याकडून घ्यायची असल्याचे पोलिसांनी न्यायालयासमोर सांगून पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. *नागपूरच्या डॉक्टरांची चौकशी सुरूच किडनी तस्करी प्रकरणामध्ये नागपूर व औरंगाबाद येथील प्रत्येकी दोन डॉक्टर आणि एका हॉस्पिटलच्या सीईओचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी पाचारण केले. दोन दिवसांपासून या डॉक्टरांची स्थानिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू असून, त्यांचे जबाबही नोंदविण्यात येत आहेत. औरंगाबादेतील दोन डॉक्टर व एका सीईओची चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले; परंतु नागपुरच्या दोन डॉक्टरांची सलग तिसर्‍या दिवशीही पोलिसांनी चौकशी करून, त्यांचे जबाब नोंदविले.*पोलिसांच्या मदतीसाठी वैद्यकीय समितीअवयव दान कायद्याबाबतची विस्तृत माहिती, किडनी काढणे व प्रत्यारोपणासंदर्भात कागदपत्रांची तरतूद कशी करायची, त्यासाठी कोणती पद्धत आहे, कायदा काय म्हणतो, याबाबत पोलिसांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मदत मागितली आहे. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांना पत्र पाठवून याप्रकरणी त्यांचे सहकार्य मागितले आहे. त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालयातर्फे तज्ज्ञ डॉक्टरांची वैद्यकीय समिती याकामी लवकरच नियुक्त करण्यात येईल.