शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी कोळीचा पासपोर्ट सांगलीतून जप्त

By admin | Updated: December 14, 2015 02:17 IST

किडनी तस्करी प्रकरण, प्रत्यारोपणाचे अहवाल ताब्यात.

अकोला - किडनी तस्करी प्रकरणामधील सूत्रधार सांगली जिल्हय़ातील शिक्षक शिवाजी कोळी याचा रविवारी स्थानिक गुन्हे शाखेने सांगलीतून पासपोर्ट जप्त केला. गत दोन दिवसांपासून पोलीस कोळीला घेऊन सांगलीत झडती घेत आहेत.किडनी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर या गोरखधंद्याच्या साखळीतील रोज एक-एक नवीन गुढ समोर येत आहे. हिमनगाचे टोक असलेल्या किडनी तस्करी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा व खदान पोलिसांच्या पथकाला तपास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, त्यानंतरही या पथकांनी किडनी तस्करी प्रकरणाचा तपास धडाक्यात सुरू केला असून, चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून या गोरखधंद्याची माहिती गोळा केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी शिवाजी कोळीचा पासपोर्ट सांगलीतून जप्त केला आहे. तर, दुसर्‍या पथकाने विनोद पवारच्या किडनी प्रत्यारोपणाचे अहवाल व बँक खातेपुस्तक जप्त केले. शिवाजी कोळी, विनोद पवार, देवेंद्र शिरसाट व आनंद जाधव या चौघांच्या नातेवाईकांचे बहुतांश दस्तऐवज त्यांनी बनावट केल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून माहिती गोळा करण्याचे काम तपास पथकांनी सुरू केले आहे. या प्रकरणात आणखी खळबळजनक माहिती उजेडात येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली.*किडनी प्रत्यारोपणाचे अहवाल जप्तकिडनी तस्करी प्रकरणातील आरोपी विनोद पवार याच्याकडून त्याच्या किडनी प्रत्यारोपणाचे अहवाल खदान पोलिसांच्या पथकाने जप्त केले आहेत. यासोबतच किडनी प्रत्यारोपण कालावधीत त्यांनी मुक्काम केलेल्या हॉटेलचे दस्तऐवजही ताब्यात घेण्यात आले आहेत. विनोद पवारच्या शरीरात आनंद चावरे याची किडनी असल्याचेही यामध्ये समोर आले आहे.*विनोद पवारचे बँक खाते पुस्तकही ताब्यात!किडनी तस्करी प्रकरणातील आरोपी विनोद पवार याच्या बँक खात्याचे पुस्तक खदान पोलिसांच्या पथकाने जप्त केले. मांडवा येथे घेण्यात आलेल्या झडतीत बँक खात्यासोबतच इतरही आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. पवार याने किडनी तस्करीमध्ये अनेकांशी व्यवहार केले असून, यामध्ये मध्यस्थी करून त्याने लाखोंची माया गोळा केली.*कोळी, पवारची आज न्यायालयात पेशीया प्रकरणातील सूत्रधार शिवाजी कोळी व विनोद पवार यांची सोमवारी पोलीस कोठडी संपणार आहे. त्यामुळे खदान पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या दोघांना सोमवारी न्यायालयासमोर हजर करणार आहेत. या दोघांकडून बरीच माहिती घेण्यात पोलिसांना यश आले आहे.