शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शिवज्योत घेऊन ‘तो’ धावला २५१ किलोमीटर!

By admin | Updated: April 29, 2017 18:39 IST

चिंचणीतील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत तब्बल ७०० किलोमीटर धावत अक्षयतृतीयेस शिवज्योत आणली.

ऑनलाइन लोकमत
कडेगाव, दि. 29 -  चिंचणी  येथील शिवप्रतिष्ठानच्या १७ जिगरबाज तरुणांनी आंध्रप्रदेशातील श्रीशैलम येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरापासून चिंचणीतील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत तब्बल ७०० किलोमीटर धावत अक्षयतृतीयेस  शिवज्योत आणली. यामध्ये अक्षय बाबासाहेब पाटोळे नावाचा २० वर्षांचा तरुण एकटा तब्बल २५१ किलोमीटर अंतर टप्प्याटप्प्याने धावला.
चिंचणी  येथे अक्षयतृतीयेस शिवजयंती साजरी केली जाते. यावर्षी श्रीशैलम येथून शिवज्योत आणण्याचे ठरले. त्यानुसार १७ कार्यकर्ते रवाना झाले होते. सुमारे ७०० किलोमीटरचे दीर्घ पल्ल्याचे अंतर सहा दिवसांत पार करण्याचे खडतर आव्हान घेऊन हे तरुण श्रीशैलम येथून २२ एप्रिलरोजी दुपारी तीन वाजता  निघाले. श्रीशैलम येथून बाहेर पडताच ८० किलोमीटरचे जंगल पार करण्याचे आव्हान होते. वन्यप्राण्यांचा धोका असल्यामुळे हा जंगल रस्ता सायंकाळी सहानंतर बंद असतो. 
शिवज्योत घेऊन निघालेले हे तरुण दुपारी चारच्या सुमारास जंगल रस्त्याने आत गेले. शिवज्योत घेऊन सर्वजण एकापाठोपाठ एक धावत होते. या जंगलात २० किलोमीटरचे अंतर एकट्या अक्षयने कापले. रात्र असल्याने भीती वाटत होती; परंतु तेवत राहणारी शिवज्योत धीर देत होती. ज्योत घेऊन धावणारा सोडून इतर तरुण टेम्पोमध्ये बसून विश्रांती घेत. हा टेम्पो सतत धावणाºयामागे असायचा. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या गीताने धावण्याची प्रेरणा मिळायची. अखेर रात्री अकरा वाजता ही ज्योत तेलंगणा राज्यात मेहबूबनगर येथे पोहोचली. २३ एप्रिलपासून पाच दिवस रोज १२५ किलोमीटर धावत कर्नाटकातील विजापूरमार्गे महाराष्ट्रातील जत, भिवघाट, विटामार्गे अक्षयतृतीयेस ही ज्योत चिंचणी येथे आणली.
या प्रवासात अक्षय दररोज सरासरी ४० किलोमीटर धावत होता. विजापूर शहरातून भर उन्हात अक्षय सलग २५ किलोमीटर धावला. तोएकटा तब्बल २५१ किलोमीटरचे अंतर टप्प्याटप्प्याने धावला. इतक्या दीर्घ पल्ल्यासाठी धावणे ही अक्षयची  पहिलीच वेळ नाही.  २०१५ मध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून येथील तरुणांनी शिवज्योत आणली होती. त्यावेळीही अक्षय २१० किलोमीटर टप्प्याटप्प्याने धावला होता. श्रीशैलम येथून शिवज्योत घेऊन येणाºया अक्षय पाटोळेसह शशिकांत पाटील, अतुल जाधव, सचिन माने, विशाल माने, खुशाल गोसावी, प्रशांत पाटोळे, ओंकार पिसाळ ,अशितोष चव्हाण, अक्षय माने, महेश पाटील, अमोल कोळी, तुषार माने, उदयसिंह पाटील, धनराज पाटील, सागर साळुंखे, संतोष सावंत यांचे चिंचणी येथील ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले.
देशासाठी लढणार - अक्षय पाटोळे
अक्षयची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आई-वडील मोलमजुरी करतात. तो मागीलवर्षी  बारावी (विज्ञान) उत्तीर्ण झाला आहे. पुढील शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून शिक्षण सोडले. भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी आता तो कसून सराव करीत आहे. शिवचरित्रातून प्रेरणा मिळाली आणि देशासाठी लढण्याचा निश्चय केला आहे, असे त्याने सांगितले.