पुणे : एमआयएम संघटनेचे ओवैसी बंधूंच्या पुण्यात होणाऱ्या सभेत धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता आहे़ त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्यास शिवसेना खपवून घेणार नाही, असा इशारा शिवसेनेचे नवनियुक्त शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी दिला आहे़ ओवैसी यांच्या सभेच्या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिक उपस्थित राहणार असून सभेमधील भाषणामध्ये हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या तर ते सहन करणार नाही आणि ती सभा बंद पाडू, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे़ (प्रतिनिधी)
ओवैसीच्या सभेबाबत शिवसेनेचा इशारा
By admin | Updated: February 2, 2015 05:14 IST