शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या हाकेला साथ देणार- हार्दिक पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2017 23:01 IST

शिवसेनेला माझी गरज भासेल तेव्हा त्यांच्या हाकेला मी साथ देणार, असे शिवसेनेचे नाव न घेता ठाम प्रतिपादन गुजरातचे धडाडीचे युवा नेते हार्दिक पटेल यांनी केले

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 7 - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची लढाई सत्याची आणि न्यायाची होती. मी त्यांना कधी पाहिले नसले तरी त्यांचा मी फॅन असून, ज्यावेळी शिवसेनेला माझी गरज भासेल तेव्हा त्यांच्या हाकेला मी साथ देणार, असे शिवसेनेचे नाव न घेता ठाम प्रतिपादन गुजरातचे धडाडीचे युवा नेते हार्दिक पटेल यांनी केले. गोरेगाव पश्चिम येथील टोपीवाला मार्केटजवळील स्टर्लिंग हॉलमध्ये पाटीदार समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पाटीदार समाजाचे नेते उपस्थित होते.यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. गुजरातमधील पटेल आणि पाटीदार जनतेवर अन्याय केला जात असून, नोटाबंदीमुळे लोकांचे मोठे हाल झाले आहेत. माझी लढाई समाज बांधवांच्या न्याय आणि हक्कासाठी आहे. आपण लढल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या न्याय व हक्काच्या लढाईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिल्याची त्यांनी सांगितले. तुमचे हित जाणणारा पक्ष तो आपला पक्ष असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. आपण सॉफिटेल हॉटेलमध्ये उतरलो होतो.मात्र गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या ठिकाणी आल्यामुळे आपल्याला या हॉटेलमधील खोली खाली करण्याचे सांगण्यात आले. आपल्या भाषणात सुभाष देसाई म्हणाले की, हार्दिक पटेलचे विचार प्रगल्भ असून तो भविष्यात बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे आपले विश्व निर्माण करेल. यावेळी शिवसेनाप्रमुखांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारला मंत्रिपदाची अपेक्षा न ठेवता दिलेला पाठिंबा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अडचणीच्या वेळी शिवसेनाप्रमुखांनी केलेले मोलाचे सहकार्य याची आठवण करून दिली. मात्र अच्छे दिन आल्यावर कोण तुम कोण हम या भाजपाच्या नीतीवर त्यांनी टीका केली. आज हार्दिक पटेलची सभा न होण्यासाठी गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी दबाव आणला, असा आरोप त्यांनी केला. मुंबईतील जनता ही शिवसेनेच्या बाजूने असून, पालिेकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.