शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
3
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
4
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
5
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
6
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
7
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
8
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
9
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
10
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
11
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेस; पाकिस्तानला लागणार मिरची..!
12
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
13
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
14
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
15
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
16
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
17
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
18
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
19
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
20
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!

शिवसेनेचा ११९ जागांचा प्रस्ताव अमान्य - भाजप

By admin | Updated: September 21, 2014 16:03 IST

शिवसेनेच्या ११९ जागांचा प्रस्ताव अमान्य असल्याचे सांगत महायुतीच्या निर्णयांबाबत वृत्तवाहिन्यांद्वारे चर्चा न करता प्रत्यक्ष भेटूनच चर्चा करु असे प्रत्युत्तर भाजपने दिले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २१ - 'युती टिकवायची असेल तर अंतिम प्रस्ताव कधीच नसतो. शिवसेनेच्या प्रस्तावावर भाजप नाखूष असल्याचे स्पष्ट करत यासंदर्भात टीव्हीद्वारे चर्चा करण्याऐवजी प्रत्यक्ष भेटूनच चर्चा करु असे प्रत्युत्तर भाजप नेत्यांनी शिवसेनेला दिले आहे. मात्र युती कायम राहावी हीच भाजपचीही इच्छा असल्याचे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे युतीमधील खेचाखेची अद्यापही सुरुच असल्याचे दिसते.
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी  रविवारी भाजपला ११९ जागा देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. दिल्लीत भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक सुरु असून या बैठकीनंतर भाजप नेते विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. विनोद तावडे म्हणाले, भाजपला १९ तर शिवसेनेला ५९ जागांवर आत्तापर्यंत कधीच विजय मिळालेला नाही. या जागांच्या अदलाबदली विषयी चर्चा करणे महत्त्वाचे आहे. याचा फायदा युतीलाच होईल. 
युती कायम राहावी यासाठी भाजपने नेहमीच जागांचा त्याग केला आहे. याउलट शिवसेनेने आजपर्यंत भाजपला एकही जागा वाढवून दिलेली नाही असा पुनरुच्चार एकनाथ खडसे यांनी केला. युती झाली त्यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजप ३२ तर शिवसेना १६ जागांवर निवडणूक लढवायची. यानंतर भाजपने शिवसेनेला सहा जागा वाढवून दिल्या. तसेच महायुती भक्कम करण्यासाठी आरपीआय नेते रामदास आठवले यांनाही राज्यसभेत भाजपच्या कोट्यातून जागा दिली. तर युती झाल्यापासून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेन भाजपला फक्त २ जागाच वाढवून दिल्या आहेत असे एकनाथ खडसे यांनी निदर्शनास आणून दिले.  भाजप आधीपासून ११९ जागांवर निवडणूक लढवत आली असून शिवसेनेच्या प्रस्तावात नवीन काहीच नसून यावर भाजप समाधानी नाही असे खडसे यांनी स्पष्ट केले. 
उद्धव ठाकरेंच्या भाषणांनतर राज्यातील भाजप कोअर कमिटीची बैठक झाली असून या बैठकीत भाजपच्या कोअर कमिटीचे मतं भाजपच्या संसदीच बोर्डाच्या बैठकीत मांडू. ही बैठक आज संध्याकाळी होईल असे विनोद तावडेंनी सांगितले. राज्यात परतल्यावर शिवसेनेसोबत प्रत्यक्ष भेटूनच चर्चा केली जाईल असेही तावडेंनी नमूद केले.