शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हर हिंदुकी एकही पुकार, पहले मंदिर फिर सरकार; अयोध्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेचा नवा नारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 17:22 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या येत्या 25 नोव्हेंबरच्या अयोध्या दौऱ्याची शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे.

 मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या येत्या 25 नोव्हेंबरच्या अयोध्या दौऱ्याची शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मान्यवर शिवसेनेचे नेते यांची आताच सेनाभवन येथे येत्या 25 नोव्हम्बर रोजी अयोध्या दौऱ्याच्या तयारीची माहिती देण्यासाठी महत्वाची बैठक पार पडली.यावेळी राज्यातील शिवसेनेचे सर्व जिल्ह्याप्रमुख,संपर्कप्रमुख,विभागप्रमुख उपस्थित होते.

शिवसेनेचा नवा नारा..हर हिंदुकी एकही पुकार..पहिले मंदिर फिर सरकार असा नारा शिवसेनेने तयार केला आहे.लक्ष्मण रेषा नजरे समोर ठेऊन येत्या 24 व 25 रोजी शिवसेना महाआरती, रॅली आणि अन्य मार्गांचा प्रभावी अवलंब करून आणि जनजागृती करून अयोध्येत  राम मंदिराची आठवण या निमित्याने झोपलेल्या कुंभकर्णाला करून देणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी लोकमतशी बोलतांना दिली.

अयोध्या हे तसे छोटे शहर असून राज्यातून मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी यांनी अयोध्येला येण्यापेक्षा आपल्या भागात आणि राज्यातील 350 तालुक्यांमध्ये येत्या 24 व 25 नोव्हेंबर रोजी  महाआरती,रॅली आणि अन्य कार्यक्रम प्रभावीपणे राबवून अयोध्येत राम मंदिर बांधण्याची मागणी शिवसेना जोरदार शक्ति प्रदर्शन करून मांडणार आहे.तर अयोध्येतील स्थानिक मंडळी हजारोंच्या संख्येने येत्या 24 व 25 नोव्हेंबरला आयोध्येत येणार आहे. नेहमी मराठी भाषेतून भाषण करणारे आणि भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेचे आसूड ओढणारे आणि सभा गाजवणारे उद्धव ठाकरे हे येत्या 25 नोव्हेंबरला अयोध्येत हिंदीत कसे भाषण करतात ,राम मंदिर उभारण्यासाठी ते काय घोषणा करतात याकडे उत्तर प्रदेश आणि देशातील जनतेचे लक्ष लागले आहे.अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा नारा देत आता उतार प्रदेश मध्ये देखिल शिवसेना आपली जोरदार ताकद येथे निर्माण करत असल्याची जोरदार चर्चा आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणAyodhyaअयोध्या