शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

शिवसेनेच्या नंदा पाटील पतीसह गेल्या भाजपात

By admin | Updated: January 20, 2017 04:07 IST

एकीकडे शिवसेनेमध्ये इतर पक्षांतील बड्या नगरसेवकांचे इनकमिंग सुरू असतानाच आता पक्षाला एक मोठा धक्का बसला आहे.

ठाणे : एकीकडे शिवसेनेमध्ये इतर पक्षांतील बड्या नगरसेवकांचे इनकमिंग सुरू असतानाच आता पक्षाला एक मोठा धक्का बसला आहे. गोकूळनगर भागातील कृष्णा पाटील या निष्ठावान शिवसैनिकाने शिवसेनेच्या सध्याच्या कारभारावर जाहीर नाराजी व्यक्त करून नगरसेविका नंदा पाटील (पत्नी) यांच्यासह रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. शिवसेनेला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या महापालिकेच्या निवडणुकीची रंगत आता आणखी वाढू लागली असून पक्षांतराचे वारेही वेगाने वाहू लागले आहेत. बाळकुमच्या भोईर अ‍ॅण्ड कंपनीने राष्ट्रवादीला धक्का देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर, आता शिवसेनेला जबरदस्त धक्का देऊन थेट निष्ठावान शिवसैनिकांची फळीच आपल्या कळपात आणण्यास भाजपाने सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या कट्टर नगरसेविका नंदा पाटील यांनी आपल्या पतीसमवेत बुधवारी रात्री उशिरा भाजपामध्ये प्रवेश केला. महापालिका आवारात मागील वर्षी आयुक्तांबरोबर कृष्णा पाटील यांचा वाद झाला होता. त्यानंतर, त्यांच्या बाजूने शिवसेना उभी राहिली नव्हती. तेव्हापासूनच त्यांच्या मनात ही सल होती. २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांची आई शारदा या भागातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. त्यानंतर, २०१२ मध्ये त्यांची पत्नी नंदा या पक्षाच्या अधिकृत उमेदवार असतानादेखील शिवसेनेने त्या ठिकाणी पक्षातील एकाला त्यांच्याविरोधात उभे केले होते. असे अपमान होत असतानाच त्यांच्यावर गोकूळनगर, आझादनगर, शेलारपाडा, गोकूळदासवाडी खोपट, मिलिंदनगर येथील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पाशी सतत टाकलेल्या अडथळ्यांनी आणि येथील झोपडीधारकांना हक्काचे घर देण्यासाठी धडपड सुरू असताना त्यातही वारंवार आडकाठी आणली गेली. या सर्व कारणांमुळेच आपण पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षात तिकीट नक्की असतानाही घुसमट, गटबाजी आणि नव्या नियुक्त्यांचा सल असल्याने भाजपात प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)‘आयुष्यातून उठविले’एकनाथ शिंदे यांच्याबाबत आदर आहे. पण सेनेतील गटबाजी आयुष्यातून उठवणारी असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. आधार वाटणारी शिवसेनेतील सिस्टीम आता संपूर्णपणे बिघडल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.