शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पक्षप्रमुखांच्या भूमिकेवर शिवसेनेचे मंत्री नाराज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2015 00:35 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याच्या भूमिकेला आमदारांच्या बैठकीत मंगळवारी एकमुखी पाठिंबा देण्यात आला असला

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याच्या भूमिकेला आमदारांच्या बैठकीत मंगळवारी एकमुखी पाठिंबा देण्यात आला असला तरी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री ठाकरे यांच्या भूमिकेवर नाराज आहेत. मागील सरकारमधील कर्जमाफी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील बँकांच्या पथ्यावर पडणारी होती. त्यामुळे भाजपाची कोंडी करताना राष्ट्रवादीला फायदा होणारी भूमिका शिवसेनेने घेऊ नये, असे सेनेच्या दोन मंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी खासगीत बोलताना सांगितले.शिवसेना आमदारांच्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची भूमिका शिवसेना प्रमुख ठाकरे यांनी घेतली असून, ही मागणी सभागृहात लावून धरण्याचे ठरले. शेतकऱ्यांबरोबरच अन्य प्रश्नांवरही सभागृहात बोलताना आपली मते सडेतोडपणे व्यक्त करण्याचे बैठकीत ठरले. शिवसेना राज्यातील सत्तेत सहभागी असली तरी सत्तेचे लाभ मुख्यत्वे भाजपाला होत असल्याने सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून मूग गिळून बसण्याची गरज नाही. राज्यातील भाजपा मंत्र्यांवर झालेल्या आरोपांशी शिवसेनेचा संबंध नाही. त्यामुळे या मंत्र्यांच्या बचावाकरिता शिवसेनेने सभागृहात आक्रमक होण्याची गरज नाही, असेही बैठकीत ठरले. (विशेष प्रतिनिधी)भाजपावर तोंडसुखसरकारमधील नियुक्त्या, बदल्या आणि निर्णय यावर केवळ भाजपाचा वरचष्मा असून, शिवसेनेला कुठेही विश्वासात घेतले जात नाही. प्रत्येक ठिकाणी भाजपाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीवरून नियुक्त्या केल्या जात आहेत. शिवसेनेचे आमदार या नात्याने काही सुचवले, शिफारस केली तर त्याला केराची टोपली दाखवली जाते, अशा तक्रारी आमदारांनी बैठकीत केल्या. शेलार यांची कुलंगडी बाहेर काढणारमुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार हे सातत्याने शिवसेनेला टीकेचे लक्ष्य करीत आहेत. शेलार यांनी मुंबई महापालिकेत केलेला भ्रष्टाचार, त्यांच्या आदेशावरून झालेले निर्णय संकलित करून शेलार यांची कुलंगडी बाहेर काढण्याचा निर्णय या वेळी झाल्याचे समजते.