शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
3
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
4
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
5
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
6
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
7
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
8
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
9
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
10
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
11
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
12
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
13
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
14
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
15
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
16
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
17
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
18
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
19
BIGG BOSS 19 House: असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
20
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल

पहिला दिवस शिवसेनेचा!

By admin | Updated: December 8, 2015 01:37 IST

स्वतंत्र विदर्भासाठी जनमताचा कौल घेण्याची मागणी करणाऱ्या महाधिवक्ता श्रीहरी अणे यांची पदावरून हकालपट्टी करा, अशी घोषणा देत सत्ताधारी शिवसेनेने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बाजी मारली.

अतुल कुलकर्णी,  नागपूरस्वतंत्र विदर्भासाठी जनमताचा कौल घेण्याची मागणी करणाऱ्या महाधिवक्ता श्रीहरी अणे यांची पदावरून हकालपट्टी करा, अशी घोषणा देत सत्ताधारी शिवसेनेने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बाजी मारली. मात्र आम्ही हा विषय विधानसभेत मांडू असे सांगत काँग्रेसने या प्रकरणापासून आज अंग काढून घेतले. श्रीहरी अणे हे महाधिवक्ता आहेत. त्यांनी स्वतंत्र विदर्भासाठी जनतेचे मत घेण्याची माणगी करणे याचा अर्थ सरकारने ती मागणी करणे असा त्याचा अर्थ निघतो. बेळगाव कारवार सीमाप्रश्न सध्या सर्वाेच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात असताना राज्याच्या महाधिवक्त्याने अशी भूमिका घेणे, मी स्वत: विदर्भवादी आहे, अशा मुलाखती माध्यमांना देणे यामुळे बेळगावची केसही कमकुवत होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा सूर उमटत असताना या विषयाचे भांडवल करण्याची संधी काँग्रेसने मात्र पहिल्याच दिवशी गमावली.शिवसेना आज या विषयावर आक्रमक झाली. पायऱ्यांवर आंदोलन करत, घोषणा देत त्यांनी विधानसभा दणाणून सोडली. आज पहिल्याच दिवशी शोकप्रस्ताव होते. त्याशिवाय सभागृहात दुसरा विषय नव्हता. मात्र शिवसेनेने सभागृहाबाहेर घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सेना सभागृहातही काही तरी करेल की काय या उत्सुकतेपोटी पत्रकार गॅलरीही गच्च भरून गेली. काँग्रेसने मात्र या महाधिवक्ता अणे यांचा विषय आम्ही विधासभेत मांडू, असे सांगून या विषयापासून पळ काढला. याबाबत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता, शिवसेनेने काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही सभागृहात काय ते मांडू ,असे सांगितले. सोमवारी श्रीहरी अणे यांचे व्याख्यान विधिमंडळात ठेवले होते ते आमच्या मागणीमुळेच विधिमंडळाला रद्द करावे लागले,असा दावाही विखे यांनी केला. तर प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले, महाधिवक्ता हे घटनात्मक पद आहे. त्यांची भूमिका ही सरकारची भूमिका आहे का? हे सरकारने स्पष्ट करावे. पण सभागृहात अथवा विधिमंडळ परिसरात कोणता विषय कसा मांडायचा हा विरोधी पक्षनेत्यांचा प्रश्न आहे. त्यांनाच विचारा.स्वतंत्र विदर्भासाठी जनमत घेण्याच्या अणे यांच्या वक्तव्यावरून मुंबईत शिवसेनेने ठिकठिकाणी आंदोलन केले. स्थानिक विभागप्रमुख आणि लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली जमलेल्या शिवसैनिकांनी निषेध नोंदविला. हुतात्मा चौक, दादर, कुर्ला, विलेपार्ले, घाटकोपर, बोरीवली आदी ठिकाणी ‘अखंड महाराष्ट्राचा विजय असो’, ‘अखंड महाराष्ट्र राहिलाच पाहिजे’, ‘महाधिवक्ता श्रीहरी अणे यांचा निषेध’ असे फलक दाखवत शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली.