शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

जिल्ह्यात शिवसेनेचे मताधिक्क्य

By admin | Published: March 06, 2017 3:23 AM

शिवसेनेने विक्रमी तीन लाख चार हजार ९१३ मते मिळवित मतदारांमध्ये प्रथम लोकप्रिय असल्याचे दाखवून दिले आहे.

आविष्कार देसाई,अलिबाग- नुकत्याच झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने विक्रमी तीन लाख चार हजार ९१३ मते मिळवित मतदारांमध्ये प्रथम लोकप्रिय असल्याचे दाखवून दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मताधिक्क्य घटून त्यांना फक्त एक लाख ६५ हजार ७०८ मतदारांनीच कौल दिला आहे. भाजपा आणि शेकापच्या मतदारांचा आलेख मात्र चढता राहिला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचीही पीछेहाट झाली आहे. आगामी काळात जिल्ह्यात शिवसेनेची घोडदौड ही अन्य प्रमुख पक्षांची डोकेदुखी ठरणार आहे.ग्रामीण राजकारणात एकेकाळी शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मक्तेदारी असायची, ती शिवसेनेने मोडीत काढली आहे. १०० कोटी रुपयांचे बजेट असणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेला केंद्र आणि राज्य सरकारचा सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी येतो. त्यामुळे सुमारे ३०० कोटी रुपयांच्या जिल्हा परिषदेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याच हातात असाव्यात असे सर्वच राजकीय पक्षांना वाटणे स्वाभाविक आहे. शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे हुशार नेते आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेमध्ये सर्वाधिक वेळा बसण्याचा मान हा शेकापलाच जातो. राष्ट्रवादी काँग्रेसनेही कमी-अधिक प्रमाणात सत्ता उपभोगली आहे. पाटील आणि तटकरे या दोन नेत्यांची जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड आणि प्रशासनावर जबरदस्त अंकुश आहे. यंदाच्या निवडणुकीत त्यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेने विशिष्ट व्यूहरचना आखली होती. गेल्या वर्षभरापासून शिवसेनेने जनतेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न सुरू केला होता. पाटील-तटकरे हे घोटाळेबाज नेते असल्याचे राजकीय भांडवल करून त्याचा डंका अखंड जिल्हाभर पिटला गेला. त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते हे पहिल्या क्रमांकावर होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी झंझावाती दौरे करून शिवसेनेला कौल देण्याचे मतदारांना आवाहन केले. शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसला रोखण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस आणि भाजपा यांची एकत्रित मोट बांधली. त्याला बहुतांश प्रमाणात यश आल्याचे निकालावरून दिसून येते. शेकापला २३ जागा, शिवसेनेला १८ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त १२ जागा आणि काँग्रेस-भाजपाला प्रत्येकी तीन जागा मिळाल्या होत्या. शेकाप-राष्ट्रवादी युतीचा फायदा शेकापला जास्त झाला, तर राष्ट्रवादी काँग्रेसला या युतीने तारले, असेच म्हणावे लागेल.राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एकचा पक्ष होता. त्या खालोखाल शेकाप आणि नंतर शिवसेनेचा क्रमांक होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापचे मताधिक्क्य सर्वाधिक होते. शिवसेना तेव्हा गणतीमध्येही नव्हती. मात्र शिवसेनेने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तब्बल तीन लाख चार हजार ९१३ मते मिळवली. शिवसेनेने मारलेली ही जोरदार मुसंडी सर्वच राजकीय पक्षांना विचार करायला लावणारी आहे. शेकापला दोन लाख ७७ हजार ३३२ मते मिळाली तर, राष्ट्रवादी काँग्रेसला एक लाख ६५ हजार ७०८, काँग्रेसला एक लाख ३० हजार ४९२, भाजपाला एक लाख ११ हजार १७० मते मिळाली. ग्रामीण निवडणुकीतील मतांची बेरीज ही भाजपासाठी चांगली गोष्ट आहे.पनवेल तालुक्यामध्ये शेकाप एक नंबरवर राहिला आहे. त्यांना ७८ हजार ३२६ मते मिळाली, दोन नंबरवर भाजपा, त्यांना ५० हजार ८३३ मते तर तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना राहिली. त्यांना नऊ हजार ४२१ मते मिळाली.>तालुकानिहाय मिळालेली मतेतालुकाशेकापशिवसेना राष्ट्रवादीभाजपाकाँग्रेसपनवेल ७८,३२६ ९,४२१ ००५०,८३३ ००कर्जत१५,८५९ ३१,५९६ ३२,४३२ ९,२७० ६,३७५खालापूर५,२५२ ३२,९६५ ३०,००२ २,१८९ ००सुधागड १२,१०१ ०० ९,०२४ ०० ००पेण ४६, १४७ १४,०४७ २,७८२, १०,०८६ २१,१५३उरण७,९८९२२,९७० ०० २०,९९० १८,१९८ अलिबाग६८,२१५ ३०,२१७ ०० १,८२० ३२,१०९मुरुड १६,०४८ १४,७२४ ०० ८६९ ००रोहे १२,२४४ २३,८८२ ३२,३३७ ७,२१५ ००तळा ०० ६,०७० १०,०६० १,६४० ४२९माणगाव ९,०३३ ३३,९८८ १९,१२९ २,५९१ १२,१५८म्हसळा ०० ९,१४७ ११,२१६ २,३७३ १,९१५श्रीवर्धन ०० १३,७४८ १३,६९०१,८३९ ४५१महाड ०० ४३,१५७ ३,९३४१,६९५ ३३,१३५पोलादपूर ६,११८ ११,२८१ १,१०२०० ४,५६९