शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना; पहिल्याच कार्यकारिणीत घेतले मोठे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 06:10 IST

भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के प्राधान्य देण्याचा महत्त्वाचा ठराव 

मुंबई - शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह मिळाल्यानंतर कार्यकारिणीची मंगळवारी पहिली बैठक होऊन त्यात सर्वाधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत मंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वात शिस्तपालन समितीची स्थापना करण्यात आली. तसेच भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के प्राधान्य देण्याचा तसेच स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा ठराव संमत करण्यात आला.

तसेच चर्चगेट रेल्वेस्थानकाला माजी केंद्रीय अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख  यांचे नाव देण्यासह महत्त्वाचे ठराव या बैठकीत करण्यात आले. आयोगाच्या निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या कार्यकारिणीची पहिली बैठक ताज प्रेसिडेंट हॉटेल येथे पार पडली. बैठकीत सरकारने आठ महिन्यांत केलेल्या कामाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. 

आपल्याला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याची जाणीव उपस्थित सदस्यांना शिंदे यांच्याकडून करून देण्यात आली. याचबरोबर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्या विचारांनी शिवसेना स्थापन झाली. ते सामाजिक कार्य पुढे नेण्याचा तसेच एकनाथ शिंदे यांच्या उठावाचे समर्थन करीत जे आमदार आणि खासदार सोबत आले त्यांच्याकडून बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाताना कोणतीही चूक होणार नाही यासंबंधीचा ठराव करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. शिवसेना सचिवपदी रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांचीही नेमणूक या बैठकीत करण्यात आली. अगोदरच्या बैठकीत झालेले निर्णयदेखील कायम करण्यात आले.

बैठकीत करण्यात आलेले अन्य ठरावचर्चगेट रेल्वेस्थानकाला माजी केंद्रीय अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांचे नाव.वीरमाता जिजाऊ आणि अहिल्याबाई होळकर यांना राष्ट्रपुरुषांच्या यादीत स्थान मिळण्यासाठी पाठपुरावा.गडकिल्ल्यांचे संवर्धन होण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. राज्यातील तरुण स्पर्धा परीक्षेकडे वळावेत यासाठी राज्यात प्रशिक्षण वर्ग तयार करावेत.

शिस्तपालन समितीचा बडगा कोणावरकोणाकडूनही पक्षशिस्तीला बाधा होणारे वर्तन घडू नये यासाठी शिस्तपालन समितीची स्थापना करण्यात आली आहे. बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई आणि सचिव संजय मोरे हे समितीचे सदस्य आहेत. ही समिती नेमकी कारवाई कोणावर करणार. ही  कारवाई ठाकरे गटातील आमदारांना लागू होणार का, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना