शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद न दिल्यास शिवसेना युती तोडणार, रामदास कदम यांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 16:44 IST

साडेचार वर्षे एकमेकांवर कठोर शब्दांत टीका केल्यानंतर  शिवसेना आणि भाजपा यांच्यात अखेर लोकसभा निवडणुकीपूर्वी युती झाली आहे. मात्र दोन्ही पक्षांमध्ये नव्याने झालेल्या युतीला काही तास उलटत नाहीत तोच दोन्ही पक्षांमध्ये वादाचे फटाके फुटू लागले आहेत.

मुंबई -  साडेचार वर्षे एकमेकांवर कठोर शब्दांत टीका केल्यानंतर  शिवसेना आणि भाजपा यांच्यात अखेर लोकसभा निवडणुकीपूर्वी युती झाली आहे. मात्र दोन्ही पक्षांमध्ये नव्याने झालेल्या युतीला काही तास उलटत नाहीत तोच दोन्ही पक्षांमध्ये वादाचे फटाके फुटू लागले आहेत. युतीची घोषणा करताना जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरी मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय झाला नव्हता. दरम्यान, युती करताना शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचे निश्चित झाले असून, शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद न मिळाल्यास शिवसेना युती तोडेल, असा इशारा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिला आहे. युतीची घोषणा आणि मुख्यमंत्रिपदाबाबत बोलताना रामदास कदम म्हणाले की, ''शिवसेना आणि भाजपामधील युती ही शिवसेनेने घातलेल्या अटींवरच झाली आहे. तसेच शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचेही ठरले आहे. आता तसे न झाल्यास शिवसेना युती तोडण्याचा निर्णय घेऊ शकेल,'' नाणार प्रकल्प रद्द करण्यापासून विविध मुद्यांवर भाजपाला झुकवत शिवसेनेने अखेर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपासोबत युती केली. भाजपाध्यक्ष अमित शहा व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चर्चेत युतीचा निर्णय झाला. त्यानुसार लोकसभेसाठी भाजपा 25 तर शिवसेना 23 जागा लढेल, असे ठरले. याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही पक्षांसमवेत दिली. तसेच विधानसभेत दोन्ही पक्ष समसमान जागा लढवणार आहेत. मात्र असे असले तरी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदम