शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडयातील १०० तरुण 'इसिस'मध्ये - शिवसेना आमदार

By admin | Updated: July 22, 2016 20:18 IST

मराठवाडयामधील परभणीतून १०० तरुण बेपत्ता झाले आहेत आणि ते 'इसिस'मध्ये दाखल झाले असतील असे खळबळजनक विधान शिवसेनेचे परभणी येथिल आमदार राहूल पाटील यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २२ : मराठवाडयामधील परभणीतून १०० तरुण बेपत्ता झाले आहेत आणि ते इसिसमध्ये दाखल झाले असतील असे खळबळजनक विधान शिवसेनेचे परभणी येथिल आमदार राहूल पाटील यांनी केले आहे. ते विधानसभेत बोलत होते. 'इसिस' या अतिजहाल दहशतवादी संघटनेला भारतात विशेष प्रभाव पाडता आला नसला तरी शिवसेनेचे आमदार राहूल पाटील यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसात टइसिसटच्या संपर्कात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातच परभणीच्या नासीरबीन चाऊसला नुकतीच 'इसिस'च्या संपर्कात आल्याच्या आरोपातून अटक झाली आहे. त्याने बॉम्ब बनवण्याचा प्रयत्न केल्याचाही खुलासा समोर आला आहे. या अटकेनंतर एमआयएमच्या नेत्यांनी युवकांना भडकावून घोषणाबाजी दिल्या. देशविरोधी कारवायांना एसआयएम पाठिबा देत असल्याचा आरोप यावेळी राहुल पाटील यांनी केला. सोबतच एमआयएमची मान्यताच कायमस्वरूपी रद्द करावी अशीही मागणी आमदार राहूल पाटील  केली. दरम्यान, एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी शिवसेनेचे आरोप फेटाळून लावले आहेत. इसिसच्या विरोधात आवाज उठवणारी एमआयएमही पहिली पार्टी असल्याचं ते म्हणाले