ठाणे : मुंबईपाठोपाठ ठाणे महापालिकेतही महापौर निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली. मागील महापौर निवडणुकीत एकसंघ असलेल्या लोकशाही आघाडीला सुरुंग लावण्यात शिवसेनेला यश प्राप्त झाल्याने ठाणे महापालिकेच्या २० व्या महापौरपदी सेनेचे संजय मोरे यांचा २० मतांनी दणदणीत विजय झाला.त्यांना ६६ तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांना ४६ मते मिळाली. उपमहापौरपदी सेनेच्याच राजेंद्र साप्ते यांनी बाजी मारली. त्यांना ६६ तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या मेघना हांडोरे यांना ४९ मते मिळाली. स्थायी समिती सभापतीपद बिनविरोध पटकावलेल्या मनसेने या उपकारांची परतफेड म्हणून महापौर निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका बजावल्याने सेनेचा विजय सहजसोपा बनला. तर आघाडीतील चार लेटलतीफ सदस्यांमुळे काँग्रेसवर पराभवाची नामुष्की ओढवली.
ठाण्यातही शिवसेनेचा महापौर
By admin | Updated: September 11, 2014 03:31 IST