शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: "गद्दारांची गाडी फोडा, जिल्हाप्रमुखपद मिळवा"; हिंगोलीत शिवसेना नेत्याचं वादग्रस्त विधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 19:05 IST

राज्यात शिंदे गटातील आमदारांविरोधात शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.

हिंगोली-

राज्यात शिंदे गटातील आमदारांविरोधात शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. तसंच उद्धव ठाकरे देखील मुंबईत शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन पक्षाला बळकटी देण्याचं काम करत आहेत. उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ असलेल्या शिवसेनेत्या नेत्यांकडून शिंदे गटातील आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. यातच हिंगोलीतील शिवसेना नेत्यानं वादग्रस्त विधान केलं आहे. गद्दार आमदारांची जो कुणी पहिली गाडी फोडेल त्याला हिंगोलीचं शिवसेना जिल्हाप्रमुखपद दिलं जाईल असं विधान शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी केलं आहे. 

शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या गद्दारांच्या गाड्या तुमच्या गावात येताच तुम्ही फोडा, तुमचा 'मातोश्री'वर सन्मान करण्यात येईल, असे बबन थोरात म्हणाले आहेत. आज हिंगोली शहरातील महावीर भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्यात थोरात यांनी हे वक्तव्य केले आहे. सध्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर हे शिंदे गटात गेल्याने हिंगोलीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नवा शिलेदार देणार आहेत. या पदासाठी हिंगोली जिल्ह्यातून अनेक जण इच्छुक आहेत आणि याच इच्छुकांना बबनराव थोरात यांनी आवाहन केलं आहे. 

नेमकं काय म्हणाले बबनराव थोरात?"तुम्हाला आता गावागावामध्ये उभं राहावं लागेल. गद्दारांना विचारावं लागेल की ज्या देवमाणसामुळे तुम्ही आमदार, खासदार झालात. त्यांच्याच पाठित खंजीर खुपसला. तुम्हाला आता आम्ही गावात येऊ देणार नाही. जे जे जिल्हाप्रमुखपदासाठी इच्छुक आहेत. त्या सगळ्यांना माझं आवाहन आहे. ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये या गद्दारांच्या गाड्या येतील आणि पहिली गाडी जो फोडेल त्याचा बहुमान आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंच्या शुभहस्ते मातोश्रीवर केला जाईल. आता आपल्याला कामाला लागायचं आहे. भामट्यांना ठेचायचं आहे. यांना रोखायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंचा जयजयकार करावा लागेल", असं बबनराव थोरात म्हणाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीShiv Senaशिवसेना