ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - मुंबई महानगपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलेच वाक् युद्ध सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईतील गिरगावमध्ये प्रचारसभा झाली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
मुख्यमंत्री म्हणाले, मराठी माणसाला शिवसेनेनं गिरगावातून बाहेर घालवलं. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत. मराठी माणसांची काळजी करणाऱ्यांनी आजपर्यंत गिरगावकरांना पाणी का दिलं नाही, असा सवालही त्यांनी केला.
मेट्रो ही मुंबईच्या विकासासाठीच आहे. मेट्रो अंडरग्राऊंड आहे. तसेत, गिरगावातील 500 परिवारांना घरं देणार असल्याचं आश्वासन देत मुख्यमंत्री म्हणाले, भाजपाला महापालिकेत आपण एक व्हिजन घेवून पुढे जायचं आहे. परंतू मुंबई पालिकेची निवडणूक होळीच्या शिमग्यापेक्षाही वाईट होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या भाषणतील काही मुद्दे -
- मराठी माणसाला शिवसेनेनं बाहेर काढलं.
- मेट्रो ही मुंबईच्या विकासासाठीच.
- मराठी माणसांची काळजी करणाऱ्यांनी आजपर्यंत गिरगावकरांना पाणी का दिलं नाही.
- तुमचे दात दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे आहेत.
- मेट्रो अंडरग्राऊंड आहे! मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेला, पण 500 परिवारांना गिरगावात घर देणार.
- परवा ते (उद्धव) म्हणाले पाणी पिता ते आमचं आहे..उद्या टाटा पण म्हणतील मीठ माझं आहे... काय सुरु आहे.
- बीडीडी चाळीत 500 चौरस फुटाचं घर आम्ही देणार.
- मी कितीवेळा पाणी पितो, हे सुद्घा मोजतात.
- मराठी माणसाला सोयी सुविधा देवू शकले नाही, तर तुम्हाला मत मागायचा अधिकार तरी आहे का?
- दर वर्षी तेच ते रस्ते करतो कारण आम्हाला मुंबईतला कंत्राटदार पोसायचे आहे, त्याचा मलिदा खायचा आहे.
- तुमच्या भाषणात मराठी माणूस आहे पण कृतीत मराठी माणूस नाही.. बीडीडी चाळीत 500 चौरस फुटाच घर आम्ही देणार.
- आरएसएसची पहिली शाखा याच गिरगावात सुरु झाली होती, म्हणून या भूमीला मी वंदन करत.
- आता महानगरपालिका आमच्या हातात देणार आहात, त्यामुळं गिरगावकरांना गिरगावमध्येच मोठं घर मिळेल, तसा विकास आराखडा आम्ही आणू.