शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

जुलैमध्ये शिवसेना भूकंप करणार- संजय राऊत

By admin | Updated: June 10, 2017 16:34 IST

जुलै महिन्यात शिवसेना भूकंप करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत.

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 10- ज्या सरकारच्या राज्यात शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात, असं सरकार काय कामाचं? असा सवाल करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. गेल्या तीन वर्षामध्ये साडेचार हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. तरिही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती का दिली जात नाही ? असा प्रश्नही संजय राऊत यांनी विचारला आहे. तसंच जुलै महिन्यात शिवसेना भूकंप करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत.
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवरून आता शिवसेना आणि भाजप यांच्यातला लढा महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे. नाशिकमधील शिवसेनेच्या संपर्क अभियानात संजय राऊत बोलत होते. आपली लढाई आता मित्रपक्षासोबत आहे, असंही संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.  
 
भाजपकडून  शिवसेनेला संपवण्यासाठी  अनेक चाली खेळल्या जात आहेत, पण तसं होणार नाही. जुलै महिन्यात आपल्या अस्तित्त्वासाठी आपण सर्वात मोठी लढाई लढणार आहोत. असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. 
तसंच समृद्धी महामार्गावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली आहे. समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ओरबाडल्या जात आहेत. पण समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही, असा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली आहे. तसंच शिवसेनेला कर्जमाफी नको तर सरसकट कर्जमुक्ती हवी आहे, त्यामुळे शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभी राहणार आहे, असंही या कार्यक्रमात संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं आहे. 
 
मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीसंदर्भात जी उच्चाधिकार समिती नेमली आहे त्यात दिवाकर रावते सहभागी होणार आहेत. या बैठकीत सहभागी होऊन ते शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडतील, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. जुलै महिन्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात शिवसेनेचे मोठे आंदोलन  होणार आहे. असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
 नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनाही संजय राऊत यांनी झापलं असल्याची माहिती मिळते आहे. नाशिकमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात शिवसेनेचे किती पदाधिकारी होते? तुम्ही पदाधिकारी म्हणून मिरवता आहात का? या प्रश्नाचं उत्तर उद्धव ठाकरेंना द्यायची तयारी ठेवा असंही संजय राऊत सेना पदाधिकाऱ्यांना खडसावून सांगितल्याचं बोललं जात आहे. 
येत्या जुलैमध्ये शिवसेनेकडून नेमका काय भूकंप होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.