शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

पिस्तुलावरून गदारोळ

By admin | Updated: March 31, 2015 04:00 IST

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कमरेला पिस्तूल लावून शालेय विद्यार्थ्यांसमोर भाषण केल्याच्या वृत्ताने सोमवारी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला.

मुंबई - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कमरेला पिस्तूल लावून शालेय विद्यार्थ्यांसमोर भाषण केल्याच्या वृत्ताने सोमवारी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांनी महाजनांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनांची पाठराखण केली. प्रश्नोत्तराच्या तासात राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित करताच विरोधकांनी महाजन यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यावर इंदिरा गांधींचा खून ज्या पद्धतीने झाला ते पाहता मंत्र्यांनी असे पिस्तूल बाळगणे गैर नाही, असे शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी सांगताच तापत्या तव्यावर तेलच पडले. मंत्री सभागृहात नसताना असा मुद्दा उपस्थित करणे गैर आहे. ते सायंकाळी येतील तेव्हा बोलतील, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगून सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विरोधक आणखी आक्रमक झाले. मंत्र्यांनी असे पिस्तूल कमरेला लावून फिरू नये, असे सांगून हा विषय संपविण्याचा प्रयत्न अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केला; मात्र त्यावर समाधान न झाल्याने विरोधकांनी प्रश्नोत्तराच्या तासावर बहिष्कार टाकला. प्रश्नोत्तराच्या तासानंतर सभागृहात आलेल्या विरोधकांनी औचित्याच्या मुद्यावरुन पुन्हा हा विषय उपस्थित केला. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार यांनी सरकारवर टिकेची झोड उठवली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना निवेदन करावे लागले. ते म्हणाले, गिरीष महाजन यांच्याकडे २० वर्षापासून शस्त्र परवाना आहे. परवाना असेल तर शस्त्र जवळ बाळगणे आवश्यक आहे. त्यात बेकायदेशिर काही नाही. मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनावर अजित पवार यांनी जोरदार हरकत घेतली. ते म्हणाले, सभागृहात अनेकांकडे परवाने असतील; पण मूकबधिर शाळेच्या मुलांसमोर पिस्तूल कमरेला लावून भाषण करणे हा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे. ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनीही मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर नाराजी व्यक्त केली. त्यावर महाजनांना आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांना सांगावे लागले.