शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिरसोली बारी पंच मंडळाचा उपक्रम : शोभायात्रेत कलशधारी महिलांचा सहभाग

By admin | Updated: August 7, 2016 22:10 IST

नागपंचमीनिमित्त नागराजाला लाह्यांचा नैवेद्य व दूध अर्पण करण्यात येते.

विलास बारीजळगाव : नागपंचमीनिमित्त नागराजाला लाह्यांचा नैवेद्य व दूध अर्पण करण्यात येते. मात्र प्राचीन काळापासून ‘नागवेली’चे सेवक असलेल्या बारी समाजबांधवांकडून नागपंचमीच्या निमित्ताने शोभायात्रा काढून शेतात विधीवत पूजा करण्यात आली.जळगाव जिल्ह्यातील शिरसोली, पहूर, शेंदुर्णी, पिंप्राळा, हरि विठ्ठल नगर, अमळनेर, चोपडा, यावल या ठिकाणी बारी समाजाचे वास्तव्य आहे. नागवेलीची (विळ्याचे पाने) शेती करणे या समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे. समुद्रमंथनातून नागवेलीचे रोप बाहेर आल्यापासून बारी समाजबांधव या नागवेलीची सेवा करीत असल्याची आख्यायिका आहे. उत्तर महाराष्ट्रासोबत विदर्भ, मराठवाडा, पुणे, उत्तरप्रदेश भागात बारी समाजबांधवांचे वास्तव्य आहे.नागपंचमीला नागवेलीचे पूजनपिढीजात व्यवसाय असलेल्या नागवेलीची शेती करणारा बारी समाजबांधव हा नागपंचमीला गावागावातून नागवेलीचे पूजन करीत असतो. जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील बारी पंच मंडळातर्फे शोभा यात्रा काढण्यात आली. कलशधारी सौभाग्यवती महिला या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. गावाशेजारी असलेल्या विठ्ठल नागपुरे यांच्या शेतात समाजाचे अध्यक्ष रंगराव बारी यांच्या हस्ते नागवेलीची विधीवत पूजा करण्यात आली.नागपंचमीला पाळली जातात ही पथ्येनागपंचमीच्या दिवशी बारी समाजबांधवांकडून स्वयंपाकघरात पोळ्या करण्यासाठी तव्याचा वापर केला जात नाही. तसेच भाजी चिरली जात नाही. एकही समाजबांधव शेतात कामाला जात नाही. शेतात खोदकाम केले जात नाही. नागवेलीची पूजा करून विश्वशांतीसाठी आणि सर्वांचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना केली जाते. बारी पंच मंडळातर्फे पूर्वी गावातील प्रत्येक घरात गुळाचे वाटप करण्यात येत होते.समाजप्रबोधनपर वह्यांचा कार्यक्रमनागपंचमीच्या दिवशी काढण्यात येत असलेल्या शोभायात्रेत समाजातील नागरिक हे जुनी लोकगीते सादर करतात. यात कुटुंबनियोजन, गरीबी, मजुरांची होणारी दैना, हगणदरीमुक्त गाव, शासकीय अनास्था यासाऱ्यावर प्रकाश टाकण्यात येत असतो.