शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त आमदारांमुळे शिंदे गटाची अडचण; कधी गोळीबार तर कधी मारहाण; प्रकरणे सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 05:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार कोणत्या ना कोणत्या वादात सापडण्याची मालिका सुरूच आहे. गेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार कोणत्या ना कोणत्या वादात सापडण्याची मालिका सुरूच आहे. गेल्या चार दिवसात एका आमदाराच्या मुलाने बंदुकीच्या धाकावर व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणे आणि दुसऱ्या आमदारांच्या समर्थकांनी पत्रकाराला केलेल्या मारहाणीची त्यात भर पडली आहे. 

मागाठाणे; मुंबई विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याने गोरेगावमधील एक व्यावसायिक राजकुमार सिंग यांना  मारहाण करत बंदुकीच्या धाकावर कार्यालयातून अपहरण केल्याचा आरोप आहे. तर पाचोरा (जि. जळगाव) येथील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकारालास शिवीगाळ केली होती. आता त्या पत्रकाराला जबर मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आपल्याला मारहाण करणारे आ. पाटील यांचे समर्थक असल्याचा आरोप त्या पत्रकारानेच केला आहे. 

गोळीबाराने सुरुवातnशिंदे गटातील दादर-माहीमचे आमदार सदा सरवणकर यांनी केलेल्या कथित गोळीबाराचे प्रकरण गाजले होते. nते व त्यांचे माजी नगरसेवक पुत्र समाधान यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. nगोळीबार केला नसल्याचा दावा सरवणकर यांनी केला होता. नंतर त्यांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली तरी ते कमालीचे वादात सापडले होते. दादर भागात या घटनेनंतर माेठा तणाव निर्माण झाला हाेता.

संताेष बांगर यांची मारहाण कळमनुरी (जि. हिंगोली) मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी एका महाविद्यालयाच्या प्राचार्याला मारहाण केल्याचे प्रकरण गाजले होते. मंत्रालयात आपल्या समर्थकांसह प्रवेश करताना झालेल्या वादावेळी त्यांनी प्रवेशद्वारावर तैनात पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी ते वादात सापडले होते. 

गायकवाडांची अर्वाच्य भाषाबुलढाणा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ९५ टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई असल्याचे विधान केले होते. त्यानंतर मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या एका नेत्याने त्यांना फोन केला असता, त्यांनी अर्वाच्च भाषा वापरल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषी खाते असताना ते विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना