शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “या ५-६ महिन्यात ८-१० भावी मुख्यमंत्री झालेत, त्यात आता...”; शहाजीबापूंचा राज ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 13:29 IST

Maharashtra News: अजूनही दहा-बारा भावी मुख्यमंत्री झाले तरी अडचण नाही. पण निवडणुका झाल्यावर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार, असे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: गुढी पाडव्यानिमित्त झालेल्या मनसेच्या पाडवा मेळाव्यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे गट, भाजपसह शिंदे गटाला कानपिचक्या दिल्या. तत्पूर्वी, राज ठाकरे यांच्या सभेआधी सेना भवन परिसरात, “महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री..! हिंदुजननायक राज ठाकरे”, अशा आशयाचे बॅनर लावले होते. यावरून आता शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांनी टोला लगावला आहे. 

शिवसेनेची गुढी आम्ही पुन्हा उभी करू, असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना, याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या पाठीशी उभी आहे. त्यामुळे संजय राऊत यांना नवीन गुढी उभी करावी लागणार आहे. याचा अर्थ राऊत यांनी शिंदे यांचे नेतृत्व वाढलेले आहे. मोठे झालेले आहे. हे मान्य केले, असे शहाजी बापू पाटील यांनी सांगितले. 

गेल्या ५-६ महिन्यात ८-१० भावी मुख्यमंत्री झालेत

राज ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केल्यासंदर्भात विचारले असता, भावी मुख्यमंत्री या पाच-सहा महिन्यांत सात-आठ झालेत. भावी होण्याला काही अडचण नाही. अजूनही दहा-बारा भावी मुख्यमंत्री झालेत तरी अडचण नाही. परंतु, उद्या निवडणूक झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच होणार, असा मला विश्वास वाटतो, असे शहाजी बापू पाटील यांनी नमूद केले. तसेच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची रात्री पाहणी केल्याप्रकरणी झालेल्या टीकेवर बोलताना, शेतकऱ्यांचे नुकसान बघत जात असताना दिवस मावळताना एखाद्या ठिकाणी गेले तरी बोलून नुकसान लक्षात घेता येते. ते रात्री ९ वाजता बैठक घेतली तरी अंदाज येतो, गावात काय घडले. टोमणे मारण्याशिवाय राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला काम राहिले नाही. शिंदे-फडणवीस सरकार रात्रंदिवस काम करत आहे. जनतेचे प्रश्न सोडवत आहेत, असे शहाजी बापू यांनी स्पष्टपणे सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRaj Thackerayराज ठाकरे