शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकार १ लाख रोजगार देणार; बेरोजगारांना 'या' क्षेत्रात नोकरीची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 16:29 IST

आम्ही MOU करून विसरणारे लोक नाही. करार झाल्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा करू असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई - राज्यातील प्रकल्प इतर राज्यात जात असल्याने महाराष्ट्रातल्या तरुणांचे रोजगार बुडतायेत असा आरोप सातत्याने विरोधकांकडून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर केला जातो. विरोधकांच्या या आरोपांना उत्तर देण्यासाठी कौशल्य विभागाच्या पुढाकाराने १ लाखाहून अधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यामुळे आता शिंदे -फडणवीस सरकार १ लाख तरुणांना रोजगार देणार आहे. १ लाखाहून अधिक रोजगारासाठी आज सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत. राजभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोशयारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. 

या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी असा निर्णय केला, आमच्या सरकारचा सर्वाधिक भर हा रोजगारावर असला पाहिजे. देशात शासकीय रोजगारावरची अघोषित बंदी ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दूर केली. १० लाख रोजगार देण्याचा निर्णय केला. त्याअंतर्गत राज्य सरकारच्या वतीने ७५ हजार बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचा निर्णय केला. त्याचसोबत खासगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून द्यायचा असं त्यांनी सांगितले. 

तसेच देशाचा महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यातील ४५ टक्के लोक रोजगारासाठी शेतीवर अवलंबून आहेत आणि शेती क्षेत्राला एवढा रोजगार देण्याची क्षमता नाही. त्यामुळे उत्पादन, सेवा क्षेत्रात जोपर्यंत नोकरीची संधी उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत युवाशक्तीच्या हाताला कुणी काम देऊ शकत नाही. नोकरीची संधी निर्माण करायची असेल तर कौशल्य विकास हे महत्त्वाचं माध्यम आहे. आम्हाला प्रशिक्षित माणसं मिळत नाही असं उद्योजक सांगतात तर तरुण आमच्या हाताला काम नाही ही दरी संपवण्यासाठी कौशल्य विभाग काम करतंय. वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन हाताला काम देण्याची जबाबदारी या विभागाने उचलली आहे. शेती क्षेत्राला सेवा, उत्पादन क्षेत्राशी जोडल्यानंतर शेतीवरील २० टक्के भार कमी होतोय असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

दरम्यान, आजच्या या कार्यक्रमात करारानुसार १ लाखाहून अधिकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. आम्ही MOU करून विसरणारे लोक नाही. करार झाल्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा करू, काही अडचणी सोडवू, सातत्याने सरकार तुमच्या संपर्कात असेल. योग्यप्रकारे सर्वजण काम कराल याचा विश्वास आहे. मंगलप्रभात लोढा यांनी या विभागाची जबाबदारी घेतल्यानंतर दरवर्षीपेक्षा ३ पट रोजगार मेळावे घेतले जात आहेत असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 'या' क्षेत्रात नोकरीची संधीया कार्यक्रमात ४४ नामांकित उद्योजक, प्लेसमेंट एजन्सी, कौशल्य विभागाचे आयुक्त यांच्यासमावेत रोजगारासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे राज्यातील १ लाखाहून अधिक बेरोजगार युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यात प्रामुख्याने हॉस्पिटॅलिटी, मीडिया अँन्ड एन्टरटेन्मेंट, बांधकाम, रिटेल, बँकिंग, एव्हिएशन या क्षेत्रात दहावी पास-नापास, बारावी, पदवीधर, पदविकाधारक, फार्मसी, आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरींग पदवी या शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढाjobनोकरी