शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानेश्वरी समजून सांगणार्‍या प्राचार्य शेवाळकरांची आठवण

By admin | Updated: May 3, 2014 16:46 IST

ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल आणि आपल्या जीवनात ज्ञानेश्वरीचे महत्त्व समजून घ्यायचे असेल तर हक्काने कुणाकडे जावे, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राचार्य राम शेवाळकर.

नानासाहेबांचा फोटो घ्यावा. - प्राचार्य राम शेवाळकरांची आज पुण्यतिथीनागपूर : ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल आणि आपल्या जीवनात ज्ञानेश्वरीचे महत्त्व समजून घ्यायचे असेल तर हक्काने कुणाकडे जावे, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राचार्य राम शेवाळकर. मराठीचा अभ्यास करणारा विद्यार्थी असो वा तत्त्वज्ञानाचे संशोधन करणारा संशोधक. प्राचार्य राम शेवाळकर हसतमुखाने सार्‍यांचेच स्वागत करायचे. आता ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल तर काही लोक आहेत पण प्राचार्य शेवाळकर सांगायचे, तसे समजावून सांगणारे लोक नाहीत. त्यामुळेच नानासाहेबांची आठवण येते. ही आठवण केवळ त्यांच्या जयंती-पुण्यतिथीलाच येते असे नाही. पण या दिवशी ती अधिक प्रकर्षाने येते. नानासाहेब म्हणजे सर्वच विचारधारेच्या लोकांना जवळचे आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व. नानासाहेबांनी प्रत्येक विचारधारेचा आदरच केला. एखाद्या विचारांवर आपली श्रद्धा असते आणि तोच विचार आपल्याला बरोबर वाटतो, हे स्वाभाविक घडते. याचा अर्थ भिन्न विचारांची माणसे चुकीचीच असतात, असे नव्हे. प्रत्येकाच्या श्रद्धा, तत्त्व, विचार वेगवेगळे असू शकतात पण ते समाजासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी असले पाहिजे. मतभेद हे जिवंतपणाचे लक्षण आहे, ते असले पाहिजेत पण मनभेद नको, हे तत्त्व नानासाहेबांनी आयुष्यभर पाळले. त्यामुळे त्यांच्याशी मनभेद असणारी माणसे सापडत नाहीत. अजातशत्रू म्हणून नानासाहेबांची ओळख होती. नानासाहेब असताना त्यांचे घर नेहमीच माणसांनी फुललेले असायचे. अनेकांच्या लिखाणाची प्रेरणा ते होते. नागपूरकरांना नानासाहेब म्हणजे नागपूरचे वैभव वाटायचे. त्यांच्या जाण्याने हे वैभव हरविले, याची खंत सर्वांनाच कायम आहे. नानासाहेबांविषयी अनेकांना कायम कुतुहल वाटायचे. एकीकडे ज्ञानेश्वरी, विनोबा आणि म. गांधी यांच्यावर भावपूर्ण विवेचन करणारे नानासाहेब स्वातंत्र्यवीर सावरकरांवरही तितक्याच पोटतिडकीने बोलायचे. त्यांची व्याख्याने एखाद्या संशोधनापेक्षा कमी नव्हती. आज नानासाहेब नाहीत पण त्यांचा मुलगा आशुतोष शेवाळकर यांनी त्यांच्या व्याख्यानाचे काही संग्रह काढले आहेत. सीडीजही आहेत. यामुळे देहरूपाने नानासाहेब नसले तरी त्यांची व्याख्याने, त्यांचा आवाज त्यांच्या चाहत्यांपर्यत पोहोचतो आहे. प्रत्येक मोठा माणूस आपल्याला हवाच असतो. पण काही बाबी मानवी मर्यादांच्या पलीकडे असतात. येणारा माणूस कधीतरी जाणार असतो. हे शाश्वत सत्य नाकारता येत नाही. नानासाहेबही अनंत आठवणींचा पट ठेवून गेले. पण त्यांच्याबाबतीत हे सत्य स्वीकारणे आजही जड जाते, हे निश्चित!