खामगाव (जि. बुलडाणा) : शेगाव येथील आनंद सागर या मनोहारी प्रकल्पाला ३0 वर्षांचा भाडेपट्टा वाढवून मिळाल्याचा गाजावाजा होत असला, तरी यासाठी संत गजानन महाराज संस्थानला गत दोन वषार्ंपासून बरेच प्रयत्न करावे लागले होते. संत गजानन महाराज संस्थानच्या आनंद सागर या प्रकल्पातील तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाने शेगाव येथील सर्व्हे नं. २२५ मधील ९४.९४ हेक्टर आर व सर्व्हे नं. २४७ मधील २.८१ हेक्टर आर अशी एकूण ९७.७५ हेक्टर आर जमीन विशेष बाब म्हणून १५ वर्षांच्या कालावधीसाठी संस्थानला दिली. त्यानंतर सर्व्हे नं. २४७ मधील क्षेत्र ६.३८ हेक्टर आर असल्याचे निदर्शनास आल्याने एकूण १0१.३२ हेक्टर आर जमिनीचा भाडेपट्टा १९९९ मध्ये संस्थानला देण्यात आला. दरम्यान, सदर जमीन कायमस्वरूपी किंवा दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी देण्याची मागणी संस्थानकडून शासनाकडे करण्यात आली. यावर नगर परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय व मंत्रालयातील आवश्यक त्या अटी, शतर्र्ींची पूर्तता संस्थानने केली. २६ डिसेंबर २0१४ रोजी संस्थानच्या भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळण्यासाठी संस्थानसह जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालयाकडून पाठपुरावा करण्यात आला. मात्र मंत्रालयातील दप्तर दिरंगाईचा फटका संस्थानलाही बसला. विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी ह्यआनंद सागरह्णला भाडेपट्टा वाढवून मिळण्यासाठी प्रयत्न करीत असतानाही मंत्रालयातील आडमुठी धोरणामुळे शेगाव संस्थानला भाडेपट्टा लवकर मिळाला नाही.न्यायालयालाही करावा लागला हस्तक्षेप!शेगाव येथील खडवाडी झोपडपट्टीच्या पुनर्वसनाबाबत न्यायालयात घेण्यात आलेल्या सुनावणीदरम्यान आनंद सागरच्या भाडेपट्ट्याचा विषय उच्च न्यायालयासमोर आला. तेव्हा न्यायालयानेही या संदर्भात शासनाकडून माहिती मागितली. त्यामुळे शासनाने आनंद सागरच्या भाडेपट्ट्याच्या फाइलला गती देत अखेर भाडेपट्टा वाढवून देण्याचा आदेशच काढला. मंत्रालयातील श्रींचे वास्तव ठरले अडसर!विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव संस्थानला भाडेपट्टा वाढवून मिळविण्यासाठी मंत्रालयातील एका श्रींचे ह्यवास्तवह्णच मोठय़ा अडचणीचे ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मुख्यमंत्र्यांकडून भाडेपट्टा वाढीला हिरवी झेंडी मिळाल्यानंतरही या अधिकार्याने कागदांचा ससेमिरा संस्थानच्या मागे लावला. अखेर सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करून मुख्यमंत्र्यांच्या संमतीने आनंद सागरला ३0 वर्षांचा भाडेपट्टा वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.लोकप्रतिनिधींचा पाठपुरावाराज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर तसेच बुलडाण्याचे तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासोबतच अकोला जिल्ह्यातील अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांनी आनंद सागरला भाडेपट्टा वाढवून मिळावा, यासाठी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा केला होता.
शेगावच्या ‘आनंद सागर’लाही बसला लालफीतशाहीचा फटका!
By admin | Updated: July 21, 2016 23:19 IST