शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शीना हत्याकांड - राय माफीचा साक्षीदार

By admin | Updated: June 21, 2016 03:45 IST

शीना बोरा हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी आणि इंद्राणी मुखर्जीचा आधीचा ड्रायव्हर श्यामवर राय याला सोमवारी विशेष सीबीआय न्यायालयाने माफीचा साक्षीदार म्हणून जाहीर केले

मुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी आणि इंद्राणी मुखर्जीचा आधीचा ड्रायव्हर श्यामवर राय याला सोमवारी विशेष सीबीआय न्यायालयाने माफीचा साक्षीदार म्हणून जाहीर केले. त्याची संपूर्ण शिक्षा माफ करण्यात आली आहे. राय माफीचा साक्षीदार झाल्याने बरीच रहस्ये पुढे येण्याची शक्यता आहे.२०१२ मध्ये झालेल्या शीना हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी श्यामवर राय याने गेल्या महिन्यात माफीचा साक्षीदार बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याने विशेष न्यायालयाला दोन पानी पत्र लिहून आपण माफीचा साक्षीदार होण्यास तयार असून आपली शिक्षा माफ करण्यात यावी, अशी विनंती केली होती. त्यावर विशेष न्यायालयाने सीबीआयला यावर उत्तर देण्यास सांगितले होते. सीबीआयनेही रायला माफीचा साक्षीदार करण्याची तयारी दर्शवली. केवळ बचाव पक्षाच्या वकिलांनी यावर आक्षेप घेतला. सोमवारच्या सुनावणीत न्या. एच.एस. महाजन यांनी रायला माफीचा साक्षीदार म्हणून जाहीर केले. ‘आता तुला या प्रकरणाबद्दल सर्व खरी माहिती द्यावी लागेल. शीना बोरा हत्या प्रकरणात कोणाची काय भूमिका होती, याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. माहिती देणार ना?’ अशी विचारणा न्या. महाजन यांनी रायकडे केली. त्यावर रायने सकारात्मक उत्तर दिले. श्यामवर राय आता या केसमधील आरोपी नसून महत्त्वाचा साक्षीदार असणार आहे. (प्रतिनिधी) माफीचा साक्षीदार होण्यासाठी कोणीही दबाव आणला नसून हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आपल्याला पश्चात्ताप होत आहे, असे रायने न्यायालयाला सांगितले. श्यामवर राय हा या हत्या प्रकरणातील पोलिसांच्या ताब्यात आलेला पहिला आरोपी आहे. त्याच्यामुळेच शीना बोरा हरवल्याप्रकरणाची बंद करण्यात आलेली फाइल पुन्हा एकदा उघडण्यात आली.