शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शीना बोरा हत्या; पीटर मुखर्जीनेच केले शीनाचे अपहरण ; इंद्राणीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 03:09 IST

शीना बोरा हत्येप्रकरणाच्या खटल्याने वेगळेच वळण घेतले आहे. या हत्येतील मुख्य आरोपी व शीनाची आई इंद्राणी मुखर्जी हिने मुलीचे अपहरण करून तिला गायब करण्यामागे पीटरचा हात असल्याचा संशय न्यायालयापुढे व्यक्त केला आहे.

मुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणाच्या खटल्याने वेगळेच वळण घेतले आहे. या हत्येतील मुख्य आरोपी व शीनाची आई इंद्राणी मुखर्जी हिने मुलीचे अपहरण करून तिला गायब करण्यामागे पीटरचा हात असल्याचा संशय न्यायालयापुढे व्यक्त केला आहे. आपल्याला अटक व्हावी, यासाठी पीटरने माफीचा साक्षीदार असलेल्या श्यामवर राय याची मदत घेऊन तशी परिस्थिती निर्माण केली, असा दावा इंद्राणीने अर्जाद्वारे केला आहे. राय हा इंद्राणीचा ड्रायव्हर आहे. बुधवारी तिने स्वहस्ताक्षरात लिहिलेला अर्ज विशेष न्यायालयात सादर केला.‘आरोपी नंबर ४ (प्रतिम मुखर्जी उर्फ पीटर) याने आरोपी नंबर ३ (श्यामवर राय) याची मदत घेऊन माझी मुलगी शीना बोरा हिचे २०१२ मध्ये अपहरण करून गायब केले आणि नंतर पुरावेही नष्ट केले, या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी माझ्याकडे काही ठोस कारणे आहेत,’ असे इंद्राणीने अर्जात म्हटले आहे.शीना बोरा खटल्याची सुनावणी सुरू होण्यापूर्वीच इंद्राणी आरोपीच्या पिंजºयात उभी राहिली. तिने तो अर्ज न्यायाधीशांना देण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचे वकील आले नसल्याने न्यायाधीशांनी तिला वकिलाद्वारे अर्ज देण्यास सांगितले.इंद्राणीने अर्जात म्हटले आहे की, माझी अटक घडवून आणली, हे सिद्ध करण्यासाठी पीटरचा १ जानेवारी २०१२ ते ३१ डिसेंबर २०१२ आणि १ जानेवारी २०१५ ते ३१ डिसेंबर २०१५ चा कॉल डाटा रेकॉर्ड (सीडीआर) तपासावा लागेल. यादरम्यानचा सीडीआर सादर करण्याचे निर्देश तपास यंत्रणेला द्यावेत.साक्षीदारांवर दबाव-पीटर मुखर्जीचे वकील श्रीकांत शिवडे यांनी इंद्राणीच्या अर्जावर प्रतिक्रिया देणे टाळले. इंद्राणीने अर्जात म्हटले आहे की, आरोपी नंबर ४ ने अन्य आरोपींसह परिस्थिती बदलून मला यात गोवले. त्याने साक्षीदारांवर दबाव आणत सर्व परिस्थिती बदलली आणि माझी अटक घडवून आणली.

टॅग्स :Sheena Bora murder caseशीना बोरा हत्या प्रकरणMurderखूनCrimeगुन्हा