शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

शीना बोरा हत्याकांड : संजीव खन्नाला ३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी

By admin | Updated: August 29, 2015 09:50 IST

शीना बोरा हत्याप्रकरणी इंद्राणी मुखर्जीचा दुसरा पती संजीव खन्नाला कोर्टाने ३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर इंद्राणी मुखर्जींला चौकशीसाठी अज्ञातस्थळी नेण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - शीना बोरा हत्याप्रकरणी मुंबईतील न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीचा दुसरा पती संजीव खन्नाला कोर्टाने ३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे मुंबई पोलिसांचे पथक इंद्राणी मुखर्जीला घेऊन चौकशीसाठी अज्ञात स्थळी रवाना झाले आहे. 
शीना बोरा हत्याप्रकरणाने राज्यभरात खळबळ माजली असून शुक्रवारी संध्याकाळपर्यंत या प्रकरणाचे गुढ उकलण्यात यश आलेले नाही. शुक्रवारी सकाळी या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार शीनाचा भाऊ मिखाईल दास मुंबईत दाखल झाला. खार पोलिस ठाण्यात त्याचा जबाब घेण्यात आला. मुंबई  पोलिसांना मी सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असून शीनाला न्याय मिळवून देणारच अशी प्रतिक्रिया मिखाईलने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, वांद्रे कोर्टाने पोलिस कोठडीत असलेल्या इंद्राणीची भेट घेण्याची परवानगी तिच्या वकिलांना दिली आहे. 
मिखाईल हा शीनाचा सख्खा भाऊ असून इंद्राणी व सिद्धार्थ दास यांचा मुलगा आहे. शीना व मिखाईल ही इंद्राणी आपली भावंडे असल्याचे इंद्राणीने आजवर सर्वांना भासवले होते. लहानपणापासून इंद्राणीच्या आई-वडिलांनी या दोघांना सांभाळले. आजी-आजोबा आजारी असल्याने आपण मुंबईला जबाब नोंदविण्यासाठी येण्यास शक्य नसल्याचे मिखाईलने सांगितले होते. तसेच जीवाला धोका असल्यानचे सांगत त्याने एकट्याने येण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांचे पथक गुवाहाटीला जाऊन त्याला मुंबईत घेऊन आले असून मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया स्वत: त्याची चौकशी करणार असल्याचे समजते. 
दरम्यान ज्या ठिकाणी शीनाचा मृतदेह जाळण्यात आला त्या पेणच्या गागोदेतील ठिकाणाहून डीएनए चाचणीसाठी आवश्यक असलेले अवशेष हाती लागल्याची माहिती या हत्याकांडाच्या तपासाशी संलग्न असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. मुंबई पोलिसांचे एक पथक इंद्राणी मुखर्जीला घेऊन चौकशीसाठी अज्ञात स्थळी रवाना झाले आहे. मुंबई पोलिसांनी शीनाच्या नावाने तिच्या ऑफिसमध्ये मेल पाठवणा-या व्यक्तीलाही अटक केली आहे.