शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

शरद पवार होऊ शकतात पुढचे पंतप्रधान - प्रफुल्ल पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 5:50 AM

सध्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे २०१९ हे वर्षे शरद पवारांचे असेल, असा विश्वास व्यक्त करत कदाचित त्यांना पंतप्रधानपदाची संधीही मिळू शकते, असा सूचक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी येथे केला.

कर्जत : सध्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे २०१९ हे वर्षे शरद पवारांचे असेल, असा विश्वास व्यक्त करत कदाचित त्यांना पंतप्रधानपदाची संधीही मिळू शकते, असा सूचक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी येथे केला.कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची दोन दिवसांची चिंतन बैठक सुरू आहे. पक्षाचे ध्येयधोरण आणि आगामी वाटचालीचा ऊहापोह माजी मंत्री पटेल यांनी केला. देशाच्या राजकारणात शरद पवार या नावाचा दबदबा आहे. पंतप्रधानही त्यांच्या शब्दाला मान देतात. मात्र सध्या राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे प्रयत्न अनेकांकडून सुरू आहेत. अशा लोकांबद्दल पवारसाहेब सौम्य भूमिका घेतात. हा सौम्यपणा सोडून त्यांनी आक्रमक भूमिका घ्यावी, अशी विनंती पटेल यांनी केली.काँग्रेसबरोबर आपले शत्रुत्व नाही; पण सध्या हे संबंध ‘कभी खुशी...कभी गम’ असे आहेत. आपल्याला खुल्या मनाने काम करावे लागेल. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढली असती तर १२५ ते १४० जागांवर विजय मिळाला असता. विधानसभा-लोकसभा निवडणूक एकत्र येऊ शकतात, पक्षाचा ठोस कार्यक्रम ठरला पाहिजे आणि त्यानुसार कामही झाले पाहिजे, असे खडे बोलही पटेल यांनी सुनावले. सत्ताधारी केवळ योजनांच्या घोषणा करीत आहेत, मात्र त्या कधी पूर्ण होतील, याबाबत कधी २०२२ तर कधी २०२४ अशी आश्वासने दिली जात आहेत. मात्र आता जनतेला खरे काय आणि खोटे काय ते कळले आहे, त्यामुळे देशातील वातावरण बदलत आहे आणि त्यानुसार पक्षाने आपल्या कार्याची दिशा ठरवावी, यासाठी ही चिंतन बैठक असल्याचे पटेल यांनी नमूद केले.कर्जत तालुक्यातील खांडपे येथील ‘रॅडिसन ब्लू’मध्ये महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसांच्या चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.चिंतन बैठकीत डॉ. पद्मसिंह पाटील, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरु ण गुजराथी, दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष चित्रा वाघ, खासदार सुप्रिया सुळे, माजी प्रदेश अध्यक्ष भास्कर जाधव, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, सचिन अहीर आदी उपस्थित होते.स्थानिक आमदार सुरेश लाड यांनी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे पुष्पगुच्छ व चांदीची गणेशमूर्ती भेट देऊन स्वागत केले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रास्ताविक केले. देशातील दुसरी कृषी क्र ांती शरद पवार यांनी केली. त्यामुळे आता आयातीऐवजी मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे.यामध्ये पवार साहेबांचे योगदान मोठे आहे. कधीही निवडणुका येवोत, आम्ही तयार आहोत, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीप्रसंगी ध्वजारोहण करताना राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, सोबत ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी.बैठकीत अर्थतज्ज्ञ सी. ए. अजित जोशी यांनी ‘देशासमोरील आणि राज्यासमोरील आर्थिक आव्हाने आणि त्याचे परिणाम’ या विषयावर व्याख्यान दिले. बैठकीला माजी मंत्री गणेश नाईक, आ. शशिकांत शिंदे, आ.अनिल तटकरे, आ. आनंद परांजपे, संजीव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष अदिती तटकरे, मुंबई शहर युवती सेलच्या अध्यक्षा अदिती नलावडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार