शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
3
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
4
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
5
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
6
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
7
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
8
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
9
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
10
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
11
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
12
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
13
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
14
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
15
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
16
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
17
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
18
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
19
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'

शरद पवार हिंदूविरोधी; त्यांना कार्यक्रमाला बोलावू नका, राष्ट्रीय वारकरी परिषदेनं काढलं पत्रक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 10:23 PM

शरद पवार हे हिंदूविरोधी असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रीय वारकरी परिषदेनं केला आहे.

मुंबई- शरद पवार हे हिंदूविरोधी असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रीय वारकरी परिषदेनं केला आहे. शरद पवार हे हिंदूविरोधी आहेत; त्यांना कार्यक्रमाला बोलावू नका, असं पत्रकच राष्ट्रीय वारकरी परिषदेनं प्रसिद्धीला दिलं आहे. शरद पवार हिंदूविरोधी असल्याचा राष्ट्रीय वारकरी परिषदेनं गंभीर आरोप केलेला आहे, शरद पवारांना वारकऱ्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला बोलावू नका, असं राष्ट्रीय वारकरी परिषदेनं पत्रकात म्हटलं आहे. पवार हिंदूविरोधी असल्याचा आक्षेपही नोंदवण्यात आला आहे. 

सर्व संप्रदायाची वारकरी मंडळी पंढरपुरात आलेली असता त्यांनी एकमतानं हा निर्णय घेतला आहे. त्याचदरम्यान वक्ते महाराजांनी एक पत्रक काढलं असून पवारांना कोणत्याही वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला बोलावू नये, असं नमूद करण्यात आला आहे. शरद पवार हे नेहमी हिंदू धर्माला विरोध करतात. रामायणाला विरोध करतात. पवार नास्तिकवादी मंडळींना पाठिंबा देण्याचं काम करतात. त्यामुळे शरद पवारांना यापुढे कुठल्याही कार्यक्रमाला वारकऱ्यांनी बोलावू नये, अशा आशयाचं हे पत्रक वक्ते महाराजांनी काढलं आहे.2018साली महाराष्ट्र सरकारचा ग्यानबा तुकाराम पुरस्कार या वक्ते महाराजांना देण्यात आला होता. वक्ते महाराज हे हिंदुत्ववादी संघटनांच्या जवळचे समजले जातात. मराठवाडा, विदर्भ आणि मुंबई हा वारकऱ्यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे याचा दूरगामी परिणाम होणार आहे. विश्व हिंदू परिषद आणि आरएसएसला जोडून वक्ते महाराजांचं काम होत असल्याचंही सांगितलं जात आहे.   

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार