शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

शरद जोशी आज हवे होते! कार्यकर्त्याने जागविलेल्या त्यांच्या आठवणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 03:19 IST

शेतक-यांच्या दारिद्र्याचे नव्हे, तर एकंदरीत भारतातील गरिबीचे मूळ चुकीच्या शासकीय धोरणात आणि शेतमालाला मिळणाºया अत्यल्प भावात आहे, असे मत संपूर्ण अभ्यासाअंती कृतिशील विचारवंत व अर्थतज्ज्ञ शरद जोशी यांनी मांडले.

- डॉ. श्याम तेलंग, नांदेडशेतक-यांच्या दारिद्र्याचे नव्हे, तर एकंदरीत भारतातील गरिबीचे मूळ चुकीच्या शासकीय धोरणात आणि शेतमालाला मिळणाºया अत्यल्प भावात आहे, असे मत संपूर्ण अभ्यासाअंती कृतिशील विचारवंत व अर्थतज्ज्ञ शरद जोशी यांनी मांडले. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठा लोकसहभाग असणारी विधायक चळवळ उभी केली. शरद जोशी यांची आज जयंती. त्यानिमित्त संघटनेच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने जागविलेल्या त्यांच्या आठवणी...खरे तर, वडिलोपार्जित अशी एकरभर जमीन नसताना भारतातील अशिक्षित, ग्रामीण भागात विखुरलेल्या, वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या जोखडात अडकलेल्या आणि अनेक कालबाह्य अंधश्रद्धा मनोभावे जपणा-या शेतक-यांना एकत्र आणणे, त्यांची एक सुसूत्र संघटना स्थापन करणे, हे सोपे काम मुळीच नव्हते, परंतु स्वच्छ विचाराची आणि प्रामाणिक कामाची ताकद किती प्रचंड असू शकते, याचे ते उदाहरण होते.स्वित्झरलँडमधील उच्चपदस्थ अधिकारीपदाचा राजीनामा देऊन भारतात परतल्यानंतर, त्यांनी प्रयोगासाठी म्हणून शेती घ्यायचे ठरविले. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आंबेठाण या छोट्याशा गावात त्यांनी पंचवीस एकर कोरडवाहू जमीन खरेदी केली, त्यास ‘अंगार मळा’ नाव दिले. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या देशाचे दोन भाग पडले आहेत. एवढेच नाही, तर त्यातील एक भाग हा दुसºया भागाचे शोषण करत आहे. एक इंडिया, हा स्वतंत्र झाला आणि दुसरा म्हणजे भारत, येथील रहिवाशांनी आणखी स्वातंत्र्याची चवच चाखली नाही. ते स्वत: सुखासीन इंडिया आणि दरिद्री भारत एकाच वेळी अनुभवत होते. इंडिया आणि भारत यातील भीषण दरी त्यांना जास्त अस्वस्थ करत होती.देशाच्या आणि व्यक्तीच्या जीवनात आर्थिक समृद्धी महत्त्वाची आहे आणि देश समृद्ध करायचा असेल, तर शेतीला प्राथमिकता देणे आवश्यक आहे, हे त्यांचे मत आणखी पक्के बनले. दुसरी एक बाब त्यांच्या निदर्शनास आली होती. ती म्हणजे शेती आणि शेतकरी यांच्यावर असलेली सरकारी बंधने. त्यामुळे एका बाजूला होणारा प्रचंड भ्रष्टाचार आणि दुसºया बाजूने होणारे शेतकºयांचे नुकसान.उद्योग व्यापाराहून कितीतरी अधिक जाचक बंधने शेतकºयांना आहेत, याची जाणीव समाजाला नाही की, खुद्द शेतकरी यावर कधी चर्चा करत नाहीत. त्यांनी पाहिले की, येथील सरकार-सत्ताधारी कुणीही असो, शेतकºयांचे सरकार म्हणवून घेतो. मात्र, संपूर्ण धोरणे शेतकरी हिताच्या विरोधात राबविते. शेतकºयांचे खरे हित पाहणारे, शेतीला उत्तेजन देणारे स्वित्झरलँड देशाचे सरकार त्यांनी पाहिले होते. शेतकºयांच्या नावावर दिली जाणारी करोडो रुपयांची सबसिडी, शेतीच्या नावावर दिल्या जाणाºया असंख्य सवलती, यांचा उपयोग केवळ शेतकºयांची पिळवणूक करण्यासाठीच होत होता. कृषिपूरक हवामान, मेहनती शेतकरी, प्रचंड मानवी शक्तीची उपलब्धता हे सर्व घटक असूनही, या कृषिप्रधान देशातील शेतकºयांची होत असलेली दियनीय अवस्था शरद जोशींच्या सहृदय मनाला पाहवली नाही. त्यातूनच ८ आॅगस्ट १९७९ रोजी शेतकरी संघटनेची स्थापना केली. खरे तर स्वत:च्या दैन्याची जाणीव नसलेला, खेडोपाडी विखरलेला हा अशिक्षित समाज एकत्र आणणे, त्यांची एक सुसूत्र संघटना काढणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांच्यात आत्मसन्मानाची जाणीव करून देणे, हे अशक्य वाटणारे कार्य या महामानवाने मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने केले. आपल्या स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठा लोकसहभाग असलेली विधायक चळवळ ठरली. शेतकºयांचा आत्मसन्मान जागृत ठेवणारी सुप्रसिद्ध घोषणा पुढे आली. ती म्हणजे, ‘भीक नको, घेऊ घामाचे दाम’!स्वातंत्र्यानंतर देशातील अनेक घटक श्रीमंत होत असताना, आपण मात्र गरीब होत चाललो आहोत, यासाठी निसर्ग जबाबदार नाही, हे नशिबाने किंवा कुठल्याही देवीच्या कोपाने झाले नाही. तर आपल्या दुरवस्थेला जबाबदार येथील चुकीचे शासकीय धोरण आहे, हे त्यांनी अडाणी शेतकºयांना सोप्या भाषेत समजून सांगितले. त्यांच्या विचाराला मानणारे अनेक अभ्यासू कार्यकर्ते गावोगावी तयार झाले.काही स्वार्थी लोक या माध्यमातून थोडेसे नाव होताच त्यांना सोडून गेले, पण प्रामाणिक तळमळ, निस्वार्थी वृत्ती आणि एक योध्याची मानसिकता, यामुळे त्यांच्या कामात खंड पडला नाही. खुल्या अर्थव्यवस्थेचा त्यांनी खुल्या मनाने पुरस्कार केला. जागतिक स्पर्धेत भारतीय शेतकरी कुठेही कमी पडणार नाही. त्यामुळे सरकारने शेतीमधील हस्तक्षेप बंद करावा. ‘इंडिया’मधील व्यवसायिकांना लोकांना जसेस्वातंत्र्य आहे, तसे स्वातंत्र्य ‘भारत’ देशातील शेतकºयांना देण्यात यावे, यासाठी त्यांनी जन्मभर प्रयत्न केले. आजही शेतकरी अत्यंत हलाखीत जीवन जगतो आहे. भारतीय अर्थव्यवस्था आणि शेती याबद्दल आपण मांडलेले प्रश्न आजही शिल्लक आहेत. येथील व्यवस्था त्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क देऊ नये, इच्छित नाहीत.नुकतेच एक उत्स्फूर्त शेतकरी आंदोलन झाले. या आंदोलनाला ऊर्जा निसंशय आपल्याच विचाराची होती. कुठल्याही व्यक्ती किंवा राजकीय पक्षाऐवजी आज शेतकरी विचारांचे नेतृत्व स्वीकारत आहे. आपण पाहिलेले दुसºया स्वातंत्र्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व भेद बाजूला सारून तो एकत्र येते आहे.हा दिवस पाहण्यासाठी, आपल्या हक्काबाबत, आत्मसन्मानाबाबत जागृत झालेल्या शेतकºयांना हवे असलेले निस्वर्थ, निर्मळ, विश्वासू आणि कणखर नेतृत्व देण्यासाठी....शरद जोशी आजआपल्यात हवे होते.

टॅग्स :Farmerशेतकरी