शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्राने नाही तर ‘शास्त्राने’ शांती-लोणारकरबाबा

By admin | Updated: September 5, 2016 00:41 IST

बुलडाणा येथे सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचा अवतार दिन साजरा.

बुलडाणा, दि. ४ : आज सगळ्या जगात अशांतता आहे. दहशतवाद, हिंसाचाराने संपूर्ण जग पोळून निघाले आहे. सर्वांंना शांतीची गरज वाटत आहे. शांतीसाठी काही लोक शस्त्रांचा वापर करीत आहे. परंतु शस्त्राने कधीच शांती निर्माण होऊ शकत नाही, त्यासाठी शास्त्राचीच गरज आहे. भगवान श्रीकृष्णांनी भगवदगीतेतुन आणि सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी सूत्रपाठरुपी शास्त्राच्या द्वारे जगाला शांतीचा आणि करुणेचा संदेश दिला आहे. त्याचे अनुकरण केल्यास जगात शांतता नांदल्या शिवाय राहणार नाही असे विचार महानुभाव पंथांचे आचार्य प.प.पु.महंत लोणारकरबाबा यांनी रविवारी बुलडाणा येथे व्यक्त केले. अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेच्यावतीने सलग २४ व्या वर्षी महानुभाव आश्रम येथे राज्यस्तरीय सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना लोणारकरबाबा बोलत होते. याप्रसंगी मंचावर आचार्य मेहकरकरबाबा. महंत कल्याणकरबाबा, महंत आवेराजबाबा, महंत संवत्सकरबाबा, महंत पेनुरकरबाबा, महानुभाव साहित्याचे गाढे अभ्यासक पुणे विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रा. डॉ. अविनाश आवलगावकर, आमदार हर्षवर्धन सपकाळ, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे, सामाजिक कार्यकर्ते विश्‍वनाथ माळी, शेंदुर्णी येथील महाराष्ट्र मार्केटींग फेडरेशनचे संचालक गोविंदसेठ अग्रवाल, ई. संतोषमुनी बिडकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना लोणाकरबाबा यांनी दहशतवाद हा अज्ञानाने निर्माण होतो. ज्ञानासाठी गीतेसारख्या शास्त्राचा उपयोग केला पाहिजे, असे सांगितले. बाराव्या शतकात सामाजीक असहिष्णुता निर्माण झाली होती, महिला आणि शुद्रांना समान अधिकार नव्हते. त्यावेळी सर्वज्ञ श्रीचक्रधरांनी शांतीच्या मार्गाने समाजात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सर्वप्रथम महिलांना धर्माचे आणि शिक्षणाचे द्वार उघडे करुन दिले. स्वामींच्या विचारांचे अनुकरण केल्यास जागतिक शांतता निर्माण होण्यास वेळ लागणार नाही,असे मत लोणारकरबाबांनी व्यक्त केले. इतर मान्यवरांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले. पंचकृष्ण प्रबोधन परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय गीता ज्ञान परिक्षेचे बक्षीस वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आनंदमुनी भोजने व बाईदेवबास लोणाकर लिखित ह्यप्रसाद सेवाह्ण आणि ह्यदृष्ठांत पाठह्ण या पुस्तकांचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या आरंभी डॉ. संदेश राठोड व डॉ. किरण वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रास्ताविक परिषदेचे उपाध्यक्ष उद्धव वाळेकर यांनी केले. संचालन महेंद्रदादा बिडकर व धनंजयदादा लोणारकर यांनी तर आभार गोपालदादा पंजाबी यांनी मानले. कार्यक्रमाला राज्यभरातुन तसेच जिल्ह्यातील काणाकोपर्‍यातून आलेले महानुभाव अनुयायी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. स्वामींचा अवतार दिन मराठी दिन व्हावा : आवलगावकरमराठी भाषेला देववानी बनविण्याचा सर्वात पहिला प्रयत्न श्रीचक्रधर स्वामींनी केला, स्वामींच्या शिष्य परिवाराने जाणीवपूर्वक मराठी भाषेत ग्रंथ निर्मिती केली. मराठी भाषेचा अभिमान बाळगणार्‍या स्वामींचा अवतार दिन खर्‍या अर्थाने मराठी भाषा दिन म्हणुन साजरा झाला पाहिजे असे मत पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रा. डॉ. अविनाश आवलगावकर यांनी व्यक्त केले. स्वामींच्या लिळांचा अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे. स्वामींच्या विचारांचे चिंतन केले पाहिजे असे आवाहन देखील आवलगावकर यांनी केले. समाजाला शाहनपण देणारा हा उत्सव : सपकाळआज आपण आकाशी झेप घेतली आहे, परंतु आपले पाय जमिनीवर स्थिर आहे का याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आज प्रचंड स्पर्धा वाढली आहे. स्पर्धेच्या या युगात कुठे थांबवं याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. अशांतता,असंतुष्टी यामुळे मनुष्य जीवन विचलीत झाले आहे. अशावेळी आपण शाहणे झालो आहे का याचे चिंतन होणे गरजेचे आहे. समाजाला शाहनपण देणारा आजचा हा उत्सव आहे असे मत आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.