शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
3
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
6
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
7
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
8
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
9
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
10
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
11
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
12
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
13
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
14
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
15
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
16
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
17
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
18
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
19
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
20
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद

शंकरराव गेडाम अनंतात विलीन

By admin | Updated: November 7, 2014 00:41 IST

ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव गेडाम यांच्यावर गुरुवारी अंबाझरी स्मशानभूमी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार नागपूर : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव गेडाम यांच्यावर गुरुवारी अंबाझरी स्मशानभूमी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकारणासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शंकरराव गेडाम यांचे बुधवारी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. गुरुवारी दुपारी १२.३० वाजता गिरीपेठ येथील निवासस्थानावरून त्यांची अंत्ययात्रा निघाली. अंबाझरी स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून त्यांना शासकीय सलामी दिली. यानंतर माजी कुलगुरू हरिभाऊ केदार यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. या शोकसभेत विदर्भवादी भाऊ जांबुवंतराव धोटे, माजी मंत्री हरिभाऊ नाईक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे, माजी मंत्री रणजित देशमुख, विनोद गुडधे पाटील, अनिल देशमुख, आ. सुधाकरराव देशमुख यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. माजी आमदार यादवराव देवगडे यांनी संचालन केले. या शोकसभेत आ. प्रकाश गजभिये, डॉ. गोविंद वर्मा, सलील देशमुख, विशाल मुत्तेमवार, माजी आमदार अशोक धवड, मधुकर वासनिक, केशवराव शेंडे, पुंडलिक जवंजाळ, जयप्रकाश गुप्ता, राजकुमार तिरपुडे, वामनराव कोंबाडे, एस.क्यू. जमा, हुकूमचंद आमधरे, दिलीप देशमुख, विठ्ठलराव टालाटुले, डॉ. भाऊ लोखंडे, रमेश गिरडे, अशोक धोटे, राम घोडे, रामभाऊ महाजन, बंडू उमरकर, नरेश मेश्राम, शिवकुमार अग्रवाल, रतिलाल मिश्रा, अ‍ॅड. मा.म. गडकरी, अरुण वनकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांनी केले सांत्वन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंकरराव गेडाम यांचे चिरंजीव संजय गेडाम यांना आज सकाळी फोन करून आपली शोकसंवेदना व्यक्त केली. तसेच महापौर प्रवीण दटके यांनी गिरीपेठ येथील निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. शासनातर्फे तहसीलदार अनिल गावित यांनी पुष्पचक्र अर्पण केले. स्वतंत्र विदर्भ हीच खरी श्रद्धांजलीज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक शंकरराव गेडाम हे राजकारणातील आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. विदर्भाचे ते कट्टर समर्थक होते. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. यासाठी विदर्भाचा मुद्दा पुन्हा एकदा रेटून धरण्यात यावा, या शब्दात आपली शोकसंवेदना सर्व मान्यवरांनी व्यक्त केली.