अक्कलकोट : तहसीलदार गुरू बिराजदार यांना मारहाण प्रकरणी शंकर सातलिंगाप्पा म्हेत्रे याला गुरुवारी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी़ बी़ पेठकर यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार बिराजदार ९ मे रोजी दुधनी येथील फ्रुटीबार आॅर्केस्ट्रा हा नियमानुसार चालतो का नाही, याबाबत तपासणी करण्यास गेले होते़ या वेळी विद्यमान आमदार सिद्धराम म्हेत्रे यांचा भाऊ व अक्कलकोट तालुका काँगे्रस कमिटीचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे याने बिराजदार यांना शिवीगाळ केली व गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता़ त्यानंतर पळून गेलेला शंकर म्हेत्रे दीड महिन्यांनी पोलिसांना शरण आल्यावर त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. तत्पूर्वी म्हेत्रे याचे सोलापूर जिल्हा सत्र न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता़
शंकर म्हेत्रे याला १४ दिवसांची कोठडी
By admin | Updated: June 20, 2015 00:21 IST