राहू : येथील शंभो महादेव पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या निनादाने अवघा परिसर दुमदुमला होता. शांतिनाथमहाराज व शंखनाथमहाराज, आमदार राहुल कुल यांच्या हस्ते पालखीरथाचे आणि पादुकांचे पूजन करण्यात आले. राहू ते पंढरपूर या पायी वारी सोहळ््यात दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत चालली आहे. पालखी सोहळ््याचे हे नववे वर्ष आहे. या वेळी भाऊसाहेब चव्हाण यांचा पालखीरथापुढे अश्व, तर हरिभाऊ विठ्ठल शिंदे यांनी रथासाठी बैलजोडी दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. शांतिनाथमहाराज, शंखनाथमहाराज, आमदार राहुल कुल, श्रीनाथ कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत, शिवाजी सोनावणे, भगवान झारांडे यांनी पालखी सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. या वेळी सरपंच मनीषा नवले, बंडू नवले, किसन शिंदे, कैलास गाढवे, बाबूशेट भटेवरा, राम झाडगे, सोमनाथ काळे, राजेंद्र काळे, विलास सोनवणे, अतुल भोसले, पाडुरंग सोनवणे, कांचन कुल, वैशाली आबणे, उज्ज्वला गाढवे, श्रीकृष्ण चौधरी, परशराम शिंदे, बापूमहाराज गाढवे, जालिंदर शिंदे, सुनीलमहाराज शिंदे, चौधरीमहाराज कोरेगावकर, शिवाजीराव कुल, सीताराम चव्हाण, अशोक शितोळे, शिवाजी जगताप, उमेश राऊत, आनंदराव कदम, सुनंदा शिंदे, प्रकाश पिलाणे, अशोक वर्पे, पृथ्वीराज जगताप, जयश्री जाधव, मधुकर जाधव, राजाराम ढमढेरे, सुभान कुल, भरत वाघ उपस्थित होते.
राहू येथून शंभो महादेव पालखीचे प्रस्थान
By admin | Updated: July 4, 2016 01:53 IST