शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शंभूदेवासाठी ५० टन भस्माची निर्मिती !

By admin | Updated: March 22, 2015 22:50 IST

शिखर शिंगणापूरची मंगळवारपासून यात्रा : पूजेसाठी लागणारे साहित्य बनविण्यासाठी परिसरातील बचतगटांची लगबग--लोकमत विशेष...

शरद देवकुळे -पळशी --महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूरच्या शंभूमहादेवाची यात्रा मंगळवार, दि. २४ पासून सुरू होत आहे. महादेवाच्या पूजेसाठी लागणारा भस्म आणि दावणा याला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने यात्रेत या पूजा साहित्याची मोठी उलाढाल होते. सध्या परिसरात तीस ते चाळीस भट्ट्यांमधून सुमारे ५० टन भस्म तयार करण्यात आला आहे. शंभूमहादेवाच्या दर्शनासाठी लाखो भाविक शिखर शिंगणापूर येथे हजेरी लावतात. दि. २४ ते दि. ४ एप्रिलअखेर होणाऱ्या यात्रेची तयारी सुरू झाली आहे. गावपरिसरात भस्म तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी लागणारा कच्चा माल सांगली जिल्ह्यातील जत येथून आणला जातो. भस्म तयार करण्यासाठी पांढरी खडी, नारळाचे केशर, सुगंधी तेल यांचा वापर केला जातो. सुरुवातीला खडी भट्टीमध्ये भाजून घेतली जाते. पावडर झाल्यानंतर त्यात पाणी मिसळून साच्याच्या साह्याने छोट्या वड्या तयार केल्या जातात. त्यानंतर कडक उन्हात त्या सुकविल्या जातात. अशी प्रक्रिया करून तयार झालेला भस्म शिंगणापूर यात्रेत विक्रीसाठी पाठविला जातो.शंभूमहादेवाच्या पूजेसाठी दावणाही मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. सुगंधी दावण्याची शेती येथील शेतकरी करत असतात. यात्रेच्या पार्श्वभूमीवर शेतातील दावणा काढून त्याच्या जुड्या बांधून सुकवून ठेवल्या जातात. भस्म आणि दावणा याची मोठी उलाढाल शिंगणापूर यात्रेत होत असते. दोन लाखांच्या भांडवलातून बचतगटांना वर्षाकाठी सर्व खर्च वजा जाता एक ते दीड लाखाचा नफा होतो.