शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अमृत मलमचे संचालक शैलेश जोशी यांची गोळी झाडून घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 11:29 IST

मध्यरात्री गोळीचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी कॅम्प पोलिसांना कळवले.

बेळगाव: देशातील प्रसिद्ध  अमृत फार्माचे व्यवस्थापकीय संचालक शैलश जोशी (वय ४०)  यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास बेळगाव येथील त्यांच्या राहत्या घरी घडली. आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते.मध्यरात्री दीड वाजता पाईपलाईन रोड गणेशपुर येथील घरी स्वतःच्याच रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडून घेऊन शैलेश जोशी यांनी आत्महत्या केली. मध्यरात्री गोळीचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी कॅम्प पोलिसांना कळवले. पोलिसांनी पाहणी करता ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या काही दिवसांपासून शैलश यकृताच्या व्याधीने त्रस्त होते. यामुळे त्यांना नैराश्य आले होते. याच नैराश्यातून त्यांनी स्वत:चे जीवन संपवल्याचे कळते. बेळगावचे माजी नगराध्यक्ष शरद जोशी यांचे ते चिरंजीव होते. प्रसिध्द अमृत मलम, अमृत फार्मा या कंपन्यांचे ते मालक होते. सध्या त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणण्यात आला आहे.

माझ्या मृत्यूला मीच जबाबदार : जोशी यांची सुसाईड नोट

स्वतःवर गोळी झाडून घेऊन बेळगावचे उद्योजक शैलेश जोशी यांनी आत्महत्या केली आहे. या घटनेने बेळगाववासीयांना मोठा धक्का बसला आहे. स्वतः व्यसनमुक्त होऊन इतरांना व्यसनमुक्तीचा धडा देणाऱ्या या तरुण उद्योजकाने अचानक आपले जीवन संपविले आहे, माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे असे त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेण्यापूर्वी लिहून ठेवले आहे, ही नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यापूर्वी मन घट्ट करून त्यांनी सुसाईड नोट लिहिली होती, आपले पत्नी व मुलींवर खूप प्रेम आहे, असेही त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याbusinessव्यवसाय