शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

काळवाडी गाव भीतीच्या छायेत, माळीण पुन्हा उद्भवण्याची शंका

By admin | Updated: August 8, 2016 23:54 IST

मृत्यूची टांगती तलवार घेऊन मृत्यूच्या दाढेत वसलेले काळवाडी (जांभोरी) हे गाव आहे.

ऑनलाइन लोकमत

तळेघर, दि. 9 - गावच्या वरच्या बाजूला रौद्ररूप धारण करून उभा असलेला भयानक डोंंगर, तर गावच्या खालच्या बाजूला डिंभे धरणाचे भव्य पाणलोटक्षेत्र व गाव तसेच पाणलोटक्षेत्राच्या मध्यभागी काही वर्षांपूर्वी पडलेली भली अशी मोठी भेग, अशी मृत्यूची टांगती तलवार घेऊन मृत्यूच्या दाढेत वसलेले काळवाडी (जांभोरी) हे गाव आहे. लवकरात लवकर या गावचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी येथील स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर खोऱ्यामध्ये काळवाडी गाव असून, कित्येक वर्षे मृत्यूच्या छायेत वसले आहे. गावच्या वरच्या बाजूला असलेल्या भव्य डोंगरावर सुटलेल्या अवस्थेत मोठमोठाले दगड आहेत. या दगडांना थोडा जरी धक्का लागला तरी गावावर हे दगड कोसळू शकतात. याच काळवाडीच्या खालच्या बाजूला डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्राचे पाणी व काही वर्षांपूर्वी धरण पूर्ण भरल्यानंतर पाण्याच्या दाबामुळे गावच्या खालच्या बाजूला मोठा आवाज होऊन मोठी भेग पडली आहे. अशा परिस्थितीत मृत्यूचा सांगाडा झालेल्या या नैसर्गिक वातावरणामध्ये काळवाडी येथील ग्रामस्थ जीवन जगत आहेत. काळवाडी नं. १ व नं. २ त्याचप्रमाणे शेळकेवस्ती असे मिळून ६० ते ७० घरे असणारे हे गाव आहे. आठ ते दहा दिवसांपासून आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. गावातील घराघरांमध्ये पाण्याचा उपळा येऊन बुडबुडे निघाले आहेत, तर या डोंगरावरील सुटलेले दगड खाली येत आहेत. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे डोंगराचे पाणी झिरपून या गावातील घरांच्या भिंतीना येऊन दोन-तीन दिवसांमध्ये घरे कोसळण्याचेही प्रकार घडले आहेत. शासनदरबारी कित्येक वर्षे या गावाच्या पुनर्वसनाचे प्रस्तावाचे घोंगडे भिजत पडले आहेत. आमच्यावर एखादी घटना घडून गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का? सरकारला आम्हा आदिवासी बापड्यांबद्दल केव्हा जाग येणार? असा प्रश्नही काळवाडी ग्रामस्थांना पडत आहे. गतवर्षी शेळकेवस्तीलगत भली मोठी भेग पडली आहे. स्थानिकांनी वारंवार प्रशासनाला याबाबत कळूनही याकडे मात्र प्रशासन व सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. याबाबत ह्यलोकमतह्णशी बोलताना ग्रामस्थ चिमा कृष्णा पारधी म्हणाले, ह्यह्यबा आम्ही दगडांकडं पाहतोय. दगड आमच्याकडं पाहत्यात. कधी आमच्यावर घाला करील सांगता येत नाही. रात-दिस झोप नाय. घरामध्ये असलेल्या पेटत्या चुलीमधून पाण्याचं उभड (बुडबुडे) निघालंत. माळीणसारखा केव्हा घाला होईल सांगता येत नाही.ह्णह्ण या गावचे विद्यमान सरपंच संजय केंगले म्हणाले, ह्यह्यया गावाचा पुनर्वसनाचा विषय कित्येक दिवस शासनदरबारी पडून आहे. शासनाने तत्काळ या गावाचे पुनर्वसन करावे. या गावावरील डोंगरालाही भेगा पडल्या असून, घरांवर मोठ्या प्रमाणात ओलावा येत आहे. घटना घडण्यापूर्वी सरकारने याबाबतची काळजी घ्यावी.ह्णह्णया गावामध्ये पावसाच्या दिवसांमध्ये घरामध्ये पाणी निघणे, घरांना तडे जाणे, डोंगरावरील दगड खाली येणे असे प्रकार घडत असतात. तत्काळ या गावाचे स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ नामदेव भोकटे, ग्रा. पं. सदस्य सुरेश भवारी, बबन पारधी, सीताराम भोकटे, ढवळा पारधी, सखाराम केंगले, सोमा भोकटे, चंद्रकांत पारधी, पांडुरंग पारधी, रमेश पारधी या ग्रामस्थांनी केली आहे.