ऑनलाइन लोकमत
ठाणे : वागळे इस्टेट भागात राहणा:या 21 वर्षीय तरुणीशी आधीचे मैत्रीचे नाटक रंगवून नंतर तिला बाहेर जेवणाच्या बहाण्याने हॉटेलमध्ये नेऊन पट्टय़ाने मारहाण करून लैंगिक अत्याचार करणा-या अजय चौरसिया याला वागळे इस्टेट पोलिसांनी 14 ऑगस्ट रोजी अटक केली आहे. त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणो न्यायालयाने दिले आहेत.
लोकमान्यनगर पाडा क्रमांक-3 येथील साईनाथ चाळीत राहणा:या चौरसियाने तिचा अनेकदा पाठलाग केला होता. गेल्या 15 ते 2क् दिवसांमध्ये तिच्याशी ओळख वाढवून तिला जेवणाच्या बहाण्याने काही बोलायचे असल्याचा बहाणा करून वागळे इस्टेट येथील द्वारका हॉटेलमध्ये 13 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 वा.च्या सुमारास नेले.
तिथे हाताने, बेल्टने मारहाण करून हॉटेलच्या रूममधून बाहेर जाण्यास प्रतिबंध करून 14 ऑगस्टच्या पहाटे 3 वा.र्पयत अत्याचार केला. तिने याप्रकरणी पहाटे 5.3क् वा.च्या सुमारास तक्रार दाखल केल्यानंतर सकाळी 11.35 वा.च्या सुमारास त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील सर्व सत्यताही पडताळण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक वाघ हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.