शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

फ्रेण्डशीपच्या नावाखाली सेक्सची आॅफर

By admin | Updated: April 6, 2017 02:11 IST

फ्रेण्डशीप क्लबच्या नावाखाली आॅनलाईन सेक्स रॅकेट चालविणाऱ्या टोळीचे बिंग फोडण्यात सायबर सेलला यश आले

मुंबई : फ्रेण्डशीप क्लबच्या नावाखाली आॅनलाईन सेक्स रॅकेट चालविणाऱ्या टोळीचे बिंग फोडण्यात सायबर सेलला यश आले. तीन विविध वेबसाईटवरुन हे सेक्स रॅकेट सुरू होते. या प्रकरणी पाच आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या टोळीने आतापर्यंत २ हजार जणांची फसवणूक करत त्यांना २० लाखांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. मोहम्मद शकीब मलिक कोटवाला (२४), गिरीष हरबंश जैस्वाल (३३), कमल सुरेश विश्वकर्मा (३१), अर्जुन रामप्रकाश कनोजिया (२८) आणि शरीफ अफजल अहमद खान (२४) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्या कार्यालयातून १६ हार्डडिस्क, ३१० सीमकार्ड, ३ लॅपटॉप आणि ३७ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.फ्रेण्डशीप क्लबच्या नावाखाली आॅनलाईन सेक्स रॅकेट सुरूअसल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सायबर सेलला मिळाली होती. त्यानुसार सायबर सेलचे पोलीस उपायुक्त अखिलेश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली याचा तपास सुरू झाला. तपासात तीन वेबसाईट सापडल्या. फ्रेण्डशीप क्लबच्या नावाखाली लाईफ टाईम मेंबरशिपची माहिती दिली जाते. तसेच हा क्लब सरकारमान्य असल्याची माहिती देण्यात येत असल्याने तरुण-तरुणींसह अनेक नामांकित मंडळींनी नोंदणी केली होती. फ्रेन्डशीप क्लबची लाईफटाईम मेंबरशीप घेतल्यानंतर सदस्याला एक आयडी क्रमांक दिला जातो. त्यानंतर वेबसाईटसाठी काम करणाऱ्या महिला एजंट प्रत्येक दिवशी त्यांच्या ग्राहकांना मुली-मुले, स्त्री-पुरूष पुरविण्यासाठी सदस्यांना भेटून ठिकाण, वेळ सांगतात. ठरल्याप्रमाणे पाच तासांमध्ये आनंद घेण्यासोबतच काम करून ११ हजार रुपयांपासून १७ हजार रुपयांपर्यंत कमविण्याची संधी असल्याची जाहिरातही या वेबसाईटवरून करण्यात येत होती.नोंदणीसाठी पेटीएमचा वापर केला जात होता. त्या आधारेच सर्व आर्थिक व्यवहार सराफाच्या खात्यातून सुरू असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यानुसार सायबर सेलच्या पथकाने मुंबादेवी स्ट्रीट, दागिना बाजार परिसरातील या सराफाच्या दुकानाबाहेर सापळा रचून वेबसाईटसाठी काम करणाऱ्या एका सदस्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, मशिद बंदर परिसरातून आपले चार साथीदार ही वेबसाईट चालवत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. सायबर पोलिसांनी सापळा रचून या टोळीचा पर्दाफाश केला. (प्रतिनिधी)।अशी ही बनवाबनवी...फ्रेण्डशीप क्लब हा सरकार मान्य आहे. तसेच १० वर्षांपूर्वी महिलांनीच याची स्थापना केल्याचे ते सदस्यांना सांगत होते. भारतासह परदेशात ५० पेक्षा अधिक शाखा असूून तब्बल २२ हजार ४९७ महिला ग्राहकांसाठी होतकरू तरूणांची आवश्यकता असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी ९४९, ९६९ आणि ९९९ फी भरून क्लबमध्ये लाईफटाईम मेंबरशीपची संधी देण्यात आली होती. सदस्य झाल्यानंतर आपल्याला आवडत्या वयानुसार, हॉटेल/घरी अशा ठिकाणी आणि दिवसा/रात्री अशा तीन गटांमध्ये हे रॅकेट चालविले जात होते.। मोहम्मद मास्टरमाईंडउच्चशिक्षित असलेला मोहम्मद या टोळीचा मास्टरमाईंड आहे. त्याचा डाटा आॅपरेटिंगचा व्यवसाय आहे. यातूनच त्याने शक्कल लढवित ही टोळी सुरु केल्याचे तपासात समोर आले आहे. मोहम्मदने स्वत: एका वेबसाईटमध्ये पैसे गुंतवले होते. मात्र त्यात त्याची फसवणूक झाल्याचे त्याने अन्य मित्रांच्या मदतीने फसवणूकीचा धंदा सुरु केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली. ।हॅप्पी कपलचीही आॅफर!या वेबसाईटवर हॅप्पी कपल, तरुण मुले- मुली अशी विभागणी केली होती. दोन्हींच्या माध्यमातून ही मंडळी पुढे फसवणूक करत असल्याचे समोर आले. या टोळीचा संपूर्ण व्यवहार हा पेटीएमद्वारे होत असे. पेटीएमच्या माध्यमातून दिवसभरात नवीन नोंदणी करण्यात आलेल्या सदस्याकडून रक्कम घेतल्यानंतर टोळी तो नंबर बंद करायची. त्यामुळे यामध्ये अनेकांची फसवणूक होत.