शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा अद्ययावतीकरण लांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2016 02:16 IST

दोनदा मुदतवाढ देऊनही महसूल विभागाकडून संगणकीकृत सातबाराच्या अद्ययावतीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ३१ डिसेंबर २०१६ ची नवी मुदत महसूल

वाशिम : दोनदा मुदतवाढ देऊनही महसूल विभागाकडून संगणकीकृत सातबाराच्या अद्ययावतीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ३१ डिसेंबर २०१६ ची नवी मुदत महसूल विभागाने दिली होती. तथापि, २७ डिसेंबरपर्यंत राज्यातील २३ जिल्ह्यांनी ५० टक्केही उद्दिष्ट गाठलेले नाही. के वळ पाच जिल्ह्यांनी ८० टक्क्यांवर काम पूर्ण केले आहे.‘संगणकीकृत सात-बाराचे अद्ययावतीकरण करण्यास राज्यातील सर्व तलाठीवर्ग तयार आहे; मात्र इंटरनेटची कनेक्टिव्हिटी व वेग याच मुख्य समस्या आहेत. राज्यात इंटरनेटचे आधी तीन सर्व्हर होते. आता सहा झाले आहेत; परंतु वेग वाढला नाही. सात-बाराच्या ‘ई-फेरफार’ प्रकल्पासाठी ‘एडिट मॉड्युल’ नावाचे आॅनलाइन सॉफ्टवेअर महसूल विभागाला पुरविण्यात आले आहे. त्यामुळे हाताने लिहिलेले सातबारा व संगणकीकृत माहिती यांची पडताळणी केली जात आहे. नियोजनानुसार हे काम ३० जून रोजी संपवायचे होते; मात्र तांत्रिक सुविधांअभावी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली. त्यावेळेतही कामे झाली नाहीत. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. यादरम्यान, तलाठी वर्गाचे आंदोलन, मनुष्यबळाची टंचाई, तसेच तांत्रिक सुविधांचा विचार करून पुन्हा या प्रकल्पासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता ही मुदत संपत आली असतानाही राज्यातील ३५ पैकी २३ जिल्ह्यांचे काम ५० टक्केही झालेले नाही. राज्यातील शेतकऱ्यांचे सर्व जुने सातबारा उतारे तपासून संगणकीय नोंदीची प्रक्रिया अतिशय किचकट आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये एका तलाठ्याकडे २०-२० हजारांचे गट आहेत. राज्यातील ३५७ तालुक्यांत सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. राज्यात २ कोटी ४५ लाख ५२ हजार २४६ खातेदार आहेत. (प्रतिनिधी)५० टक्क्यांहून कमी काम झालेले जिल्हेचंद्रपूर (४९.६६), नाशिक (४५.८०), गोंदिया (४५.०२),परभणी (४४.३८), यवतमाळ (४४.२२), भंडारा (४३.७४), बुलडाणा (४२.०४), ठाणे (४१.९४), सोलापूर (४१.६०), अहमदनगर (३८.२२), कोल्हापूर (३७.५१), जळगाव (३२.१०), रायगड ३२.००), पालघर (२८.८४), धुळे (२५.४९), सातारा (२४.८२), पुणे (२४.५७), बीड (१६.०६), अमरावती (१५.८७), रत्नागिरी (१०.०७), सिंधुदुर्ग (६.२१) आणि सांगली (४.०१) या जिल्ह्यांचा समावेश आहे.