शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मोहरीच्या तेलाचा सात हजार किलो भेसळयुक्त साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 18:26 IST

पुण्यातील येवलेवाडी येथील एनएमसी व्हेज आॅइल्स अ‍ॅन्ड केक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर छापा टाकून आरोग्यासाठी धोकादायक असलेले सुमारे ७ हजार १६३ किलो भेसळयुक्त मोहरी तेलाचा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी शुक्रवारी दुपारी जप्त केला.

पुणे: पुण्यातील येवलेवाडी येथील एनएमसी व्हेज आॅइल्स अ‍ॅन्ड केक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर छापा टाकून आरोग्यासाठी धोकादायक असलेले सुमारे ७ हजार १६३ किलो भेसळयुक्त मोहरी तेलाचा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी शुक्रवारी दुपारी जप्त केला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने भेसळयुक्त तेल, मिठाई व अन्य सर्वच प्रकारच्या कारवाई सुरू केल्या आहेत.अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने येवलेवाडी येथील एनएमसी व्हेज आॅइल्स अ‍ॅन्ड केक्स प्रायव्हेट लिमिटेड छापा टाकला असता अत्यंत अस्वच्छ व आरोग्यासाठी धोकादायक वातावरणामध्ये मोहरी तेलाचे पॅकिंग सुरु असल्याचे आढळून आले. तसेच जुन्या लेबलवर स्टीकर चिकटवून मुदत संपलेले खाद्यतेलाच्या बाटल्यांनाच नवीन लेबल लावला जात असल्याचे आढळून आले. भेसळीच्या संशयावरून ४ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. यामध्ये २ लाख ३८ हजार २०० रुपयांच्या १ लिटरच्या ३ हजार १७६ बाटल्या, २ लाख ४० हजार ८६४ रुपयांच्या अर्धा लिटरच्या ६ हजार १७६ बाटल्या, ६७ हजार ८१५ रुपयांचे ५ लिटरचे १७६ कॅन व ५४ हजार ६६ रुपयांचे १५ किलोचे ४९ डबे मोहरी तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या साठ्याची एकूण किंमत ६ लाख ९४५ रुपये एवढी आहे.भेसळयुक्त तेलाचे साठे तापासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. या नमुन्याचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त संपत देशमुख यांनी सांगितले.