शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातांत सात जणांचा मृत्यू

By admin | Updated: January 22, 2017 01:38 IST

पुणे आणि नाशिक जिल्ह्यात शनिवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत सात जण मृत्युमुखी पडले, तर २७ जण जखमी झाले.

पुणे/नगर : पुणे आणि नाशिक जिल्ह्यात शनिवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत सात जण मृत्युमुखी पडले, तर २७ जण जखमी झाले. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर, इंदापूरजवळ सरडेवाडी टोलनाक्याच्या अलीकडे हॉटेल राऊतजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव लक्झरी बस पलटी झाली. यात चार जण मृत्युमुखी पडले, तर १२ जण जखमी झाले. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. श्रवण केंद्रे (वय २५, रा.डोंबिवली), विशाल गोकुळ लाड (३२ रा. विजयंत नगर , सातारा परिसर. मूळ रा. औरंगाबाद), घंटा कर्णाकर (३२, रा. हैद्राबाद), अमीरउल्ला बाबावल्ली खान (३५, रा.फोर्ट व्हील कॉलनी, उप्परपल्ली,हैद्राबाद) अशी मृतांची नावे आहेत.प्रीतेश पटेल (३६, रा.अहमदाबाद), राजेश माणिक शितोळे (४६, रा.वाघोली), नीलेश सोमनाथ मिळासाहेत (रा.पाली ता.कराड, जि सातारा), नीलेश अशोक गोडबोले (रा. बदलापूर) अशी गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत.ही लक्झरी बस ४० प्रवाशी घेऊन हैदराबादहून मुंबईला निघाली होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजक पार करून रस्त्याच्या उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे आली. दोन-तीन पलट्या खात, जवळपास १०० फूट फरफटत हॉटेलसमोरच्या पानपट्टीवर आदळली. वाहनचालक उस्मान सय्यद याच्याविरुध्द इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे...तर त्याचा जीव बचावला असतासरडेवाडी टोलनाक्याची रुग्णवाहिका व क्रेन वेळेवर पोहोचल्या नाहीत. क्रेन आली, पण तिला हायड्रोलिक बेल्ट नव्हता. त्यामुळे लक्झरी बसखाली सापडलेल्या एका प्रवाशाचे प्राण वाचवता आले नाहीत. दुसरी क्रेन येईपर्यंत त्याचा जीव गेला, पोलिसांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)मुंबईचे तिघे मृत्युमुखीदुसरा अपघात नाशिक-पुणे महामार्गावर चंदनापुरी गावाजवळ सकाळी साडेअकराच्या सुमारास झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या मिनी ट्रॅव्हल बसने स्विफ्ट मोटारीला जोरदार धडक दिल्याने तीन जण जागीच मृत्युमुखी पडले, तर १५ जण जखमी झाले. मृत तिघेही मुंबईचे रहिवासी असून, ते शिर्डीहून साईबाबांचे दर्शन घेऊन मुंबईकडे जात असताना, काळाने त्यांच्यावर घाला घातला.सोपान क ाशिनाथ थोरात, राजन डी. ठक्कर (दोघे रा. घाटकोपर, मुंबई) व गोकरण भगवतीप्रसाद डुबे (रा. कुर्ला, मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. मिनी प्रवासी बस १६ प्रवाशांना घेऊन त्र्यंबकेश्वरला जात होती. त्यातील १५ प्रवासी जखमी झाले आहेत. ते सर्व जण पुणे व पिंपरी-चिंचवडमधील रहिवासी आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना सहकार्य करत संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात मदत केली.