दोन अपघातांत सात जणांचा मृत्यू

By admin | Published: January 22, 2017 01:38 AM2017-01-22T01:38:05+5:302017-01-22T01:38:05+5:30

पुणे आणि नाशिक जिल्ह्यात शनिवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत सात जण मृत्युमुखी पडले, तर २७ जण जखमी झाले.

Seven people die in two accidents | दोन अपघातांत सात जणांचा मृत्यू

दोन अपघातांत सात जणांचा मृत्यू

Next

पुणे/नगर : पुणे आणि नाशिक जिल्ह्यात शनिवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत सात जण मृत्युमुखी पडले, तर २७ जण जखमी झाले.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर, इंदापूरजवळ सरडेवाडी टोलनाक्याच्या अलीकडे हॉटेल राऊतजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव लक्झरी बस पलटी झाली. यात चार जण मृत्युमुखी पडले, तर १२ जण जखमी झाले. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला.
श्रवण केंद्रे (वय २५, रा.डोंबिवली), विशाल गोकुळ लाड (३२ रा. विजयंत नगर , सातारा परिसर. मूळ रा. औरंगाबाद), घंटा कर्णाकर (३२, रा. हैद्राबाद), अमीरउल्ला बाबावल्ली खान (३५, रा.फोर्ट व्हील कॉलनी, उप्परपल्ली,हैद्राबाद) अशी मृतांची नावे आहेत.
प्रीतेश पटेल (३६, रा.अहमदाबाद), राजेश माणिक शितोळे (४६, रा.वाघोली), नीलेश सोमनाथ मिळासाहेत (रा.पाली ता.कराड, जि सातारा), नीलेश अशोक गोडबोले (रा. बदलापूर) अशी गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत.
ही लक्झरी बस ४० प्रवाशी घेऊन हैदराबादहून मुंबईला निघाली
होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजक पार करून रस्त्याच्या उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे आली. दोन-तीन पलट्या खात, जवळपास १०० फूट फरफटत हॉटेलसमोरच्या पानपट्टीवर आदळली. वाहनचालक उस्मान सय्यद याच्याविरुध्द इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
..तर त्याचा जीव बचावला असता
सरडेवाडी टोलनाक्याची रुग्णवाहिका व क्रेन वेळेवर पोहोचल्या नाहीत. क्रेन आली, पण
तिला हायड्रोलिक बेल्ट नव्हता. त्यामुळे लक्झरी बसखाली सापडलेल्या एका प्रवाशाचे प्राण वाचवता आले नाहीत. दुसरी क्रेन येईपर्यंत त्याचा जीव गेला, पोलिसांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

मुंबईचे तिघे मृत्युमुखी
दुसरा अपघात नाशिक-पुणे महामार्गावर चंदनापुरी गावाजवळ सकाळी साडेअकराच्या सुमारास झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या मिनी ट्रॅव्हल बसने स्विफ्ट मोटारीला जोरदार धडक दिल्याने तीन जण जागीच मृत्युमुखी पडले, तर १५ जण जखमी झाले. मृत तिघेही मुंबईचे रहिवासी असून, ते शिर्डीहून साईबाबांचे दर्शन घेऊन मुंबईकडे जात असताना, काळाने त्यांच्यावर घाला घातला.
सोपान क ाशिनाथ थोरात, राजन डी. ठक्कर (दोघे रा. घाटकोपर, मुंबई) व गोकरण भगवतीप्रसाद डुबे (रा. कुर्ला, मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. मिनी प्रवासी बस १६ प्रवाशांना घेऊन त्र्यंबकेश्वरला जात होती. त्यातील १५ प्रवासी जखमी झाले आहेत. ते सर्व जण पुणे व पिंपरी-चिंचवडमधील रहिवासी आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना सहकार्य करत संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात मदत केली.

Web Title: Seven people die in two accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.