शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीमधील आणखी सात पोलीस निलंबित; अटकेतील पोलिसांचे तपासात असहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 06:21 IST

‘थर्ड डिग्री’चा वापर केल्याने संशयित आरोपी अनिकेत कोथळेचा कोठडीत मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठांना न दिल्याप्रकरणी, सांगली शहर पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदारासह आणखी सात पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. सांगली जिल्हा पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी शुक्रवारी रात्री ही कारवाई केली.

सांगली : ‘थर्ड डिग्री’चा वापर केल्याने संशयित आरोपी अनिकेत कोथळेचा कोठडीत मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठांना न दिल्याप्रकरणी, सांगली शहर पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदारासह आणखी सात पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. सांगली जिल्हा पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी शुक्रवारी रात्री ही कारवाई केली.निलंबित ठाणे अंमलदार मिलिंद शिंदे, पोलीस कोठडीचे गार्डप्रमुख प्रदीप रामचंद्र जाधव, श्रीकांत सुरेश बुलबुले, ज्योती चंद्रकांत वाजे, स्वरूपा संतोष पाटील, वायरलेस आॅपरेटर सुभद्रा विठ्ठल साबळे व गजानन जगन्नाथ व्हावळ यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेशही शिंदे यांनी दिले आहेत.बॅग व्यापा-याकडे चौकशीअनिकेत हा बॅग व्यापारी नीलेश खत्री याच्याकडे कामाला होता. खत्रीने कामटेमार्फत त्याचा ‘काटा’ काढल्याचा आरोप कोथळे कुटुंबाने केला होता. शनिवारी सीआयडीने खत्री याची तासभर चौकशी केली.अश्लील ‘सीडी’चा तपास करणारलकी बॅग्ज दुकानात महिलांचे अश्लील चित्रीकरण केले जात होते. त्याची सीडी बनविण्यात येत होती. अनिकेतला त्याची माहिती मिळाली होती. त्यातून युवराज कामटे यास सुपारी देऊन अनिकेतचा खून केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. त्याचाही सीआयडी तपास करणार आहे.‘थर्ड डिग्री’चा वापर करून बेदम मारहाणआतापर्यंत या प्रकरणात १२ पोलीस निलंबित झाले आहेत. कवलापूर (ता. मिरज)येथील संतोष गायकवाड यांना लुबाडल्याप्रकरणी अनिकेत कोथळे व अमोल भंडारे यांना सोमवारी अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी निलंबित पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला व ‘झीरो’ पोलीस झाकीर पट्टेवाले यांनी ‘थर्ड डिग्री’चा वापर करून, अनिकेतला बेदम मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला.अनिकेत कोथळे मृत्युप्रकरणी आतापर्यंत १२ पोलिसांवर कारवाई केली आहे. गरज पडल्यास सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचीही भूमिका तपासली जाईल. हा खटला जलदगती न्यायालयात चालविला जाईल.- दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री

टॅग्स :Policeपोलिस