शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यांच्या बाळाने खेळता-खेळता गिळला एलईडी बल्ब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 02:01 IST

चिपळूणमध्ये राहणा-या ७ महिन्यांच्या अरिबाने खेळता-खेळता चुकून एलईडी बल्ब गिळला. पालकांना वाटले की तिने, दोरा किंवा मोबाइलची पिन गिळली असावी.

मुंबई : चिपळूणमध्ये राहणा-या ७ महिन्यांच्या अरिबाने खेळता-खेळता चुकून एलईडी बल्ब गिळला. पालकांना वाटले की तिने, दोरा किंवा मोबाइलची पिन गिळली असावी. त्यानंतर तिला सतत खोकला आणि ताप येऊ लागला. पालक तिला स्थानिक डॉक्टरांकडे घेऊन गेले, पण खोकला कमी होत नव्हता. तिच्या उजव्या बाजूच्या फुप्फुसामध्ये बाह्यघटक असल्याचे तिच्या एक्स-रेमध्ये आढळून आले. त्यानंतर, आठवडाभराने त्यांनी अरिबाला परळ येथील बाई जेरबाई वाडिया बालरुग्णालयात दाखल केले. त्या वेळी डॉक्टरांनी वेळ न दवडता तपासणी करून ब्लॉन्कोस्कोपीने अगदी दोन मिनिटांत हा बल्ब बाहेर काढला.परळ येथील वाडिया रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाच्या प्रमुख डॉ. दिव्या प्रभावत यांनी याविषयी सांगितले की, बाह्यघटक बरेच दिवस तिथे राहिल्याने संपूर्ण फुप्फुसामध्ये कणिका उती (उतीचे कण) आढळून आली. हा संसर्ग काढून टाकण्यासाठी इंट्राव्हेनस (थेट नसेमधून) प्रतिजैविके आणि स्टेरॉइड्स देण्यात आली. त्यानंतर, पुन्हा एकदा ब्रॉन्कोस्कोपी केली आणि दोन मिनिटांत हा बाह्यघटक (स्कोपमधून केवळ एक वायर दिसत होती) फोरसेप्सचा वापर करून काढण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे, तो दोन सेंटिमीटरचा एलईडी बल्ब होता.बल्ब गिळला अन् कळलेच नाही : -अरिबाने खेळता-खेळता चुकून बल्ब गिळला होता, हे लक्षातच आले नाही. शिवाय, बºयाच स्थानिक डॉक्टरांकडे तपासण्यांसाठी फिरत राहिलो. अखेर वाडिया रुग्णालयात आल्यानंतर डॉक्टरांनी त्वरित निदान करून उपचार केले. त्यामुळे मुलीच्या जिवाचा धोका टळला.- नौशाद खान (अरिबाचे वडील)रुग्णालयात सर्वाधिक ब्रॉन्कोस्कोपी : देशातील सर्वाधिक पेडिअ‍ॅट्रिक ब्रॉन्कोस्कोपी केल्या आहेत आणि अनेक मोठ्या रुग्णालयांतून या ठिकाणी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कमी कालावधीत, कमी वेदनेसह अनेक लहानग्यांच्या जिवाचा धोका टाळण्यात डॉक्टरांच्या चमूला यश आले आहे. अनेकदा पालक मुलांना खेळायला बारीकसारीक वस्तू देतात. मुले त्या चुकून गिळतात. त्यामुळे अशा वस्तू पालकांनी मुलांना खेळण्यासाठी देणे टाळावे. - डॉ. मिनी बोधनवाला

टॅग्स :Mumbaiमुंबईdoctorडॉक्टर