शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईसाठी सीईओ नेमणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर - उद्धव ठाकरे

By admin | Updated: November 10, 2014 08:40 IST

मुंबईसाठी सीईओ नेमणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशीच शक्यता जास्त असे सांगत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाला विरोध केला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १० -  मुंबईसाठी सीईओ नेमणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशीच शक्यता जास्त असे सांगत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाला विरोध केला आहे. मुंबई महानगरपालिकेला कमजोर करायचे व दुसर्‍या बाजूला ही ‘सीईओ’सारखी भुते उभी करून नवे पेच टाकायचे. यामुळे समस्या कमी होण्याऐवजी वाढीस लागणार आहेत, असे 'सामना'तील अग्रलेखात म्हटले आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजधानीविषयी निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेसारख्या पक्षाचे मत विचारात घेतले तर बरे होईल, असा इशाराही लेखातून देण्यात आला आहे. यापूर्वीही शिवसेनेने मुंबईसाठी सीईओ नेमण्यास विरोध केला होता. सीईओ नेमणे म्हणजे महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव आहे असा आरोप शिवसेनेचे खासदार राहूल शेवाळे यांनी केला होता. आजच्या अग्रलेखातून सेनेची विरोधाची भूमिकाच कायम राहिल्याचे दिसत आहे. 
 
अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे :
- मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे व मुंबईसारख्या मोठ्या शहरांचे काही प्रश्‍न आहेत. हेच प्रश्‍न कोलकाता, बंगळुरू, दिल्ली, गुरगाव, हैदराबादसारख्या शहरांचे असू शकतात. लोकसंख्येचे लोंढे मोठ्या शहरांवर आदळत आहेत व त्याचा भार नागरी सुविधांवर पडत आहे. पण त्यासाठी ‘सीईओ’ नेमून काय होणार? याआधी विकास वगैरे करण्याच्या नावाखाली ‘एमएमआरडीए’नामक प्रकरण मुंबईच्या बोडक्यावर मारले गेले. त्या ‘एमएमआरडीए’ने काय दिवे लावले? याचाही अभ्यास राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी केला तर बरे होईल. 
 
- मुंबई महानगरपालिकेला कमजोर करायचे व दुसर्‍या बाजूला ही ‘सीईओ’सारखी भुते उभी करून नवे पेच टाकायचे. यामुळे समस्या कमी होण्याऐवजी वाढीस लागणार आहेत. तेव्हा मुंबईसाठी स्वतंत्र ‘सीईओ’ नेमणे म्हणजे आजारापेक्षा इलाज भयंकर अशीच शक्यता जास्त. 
 
- त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे जे अधिकार केवळ राजकीय हेतूने यापूर्वीच्या कॉंग्रेस राजवटींनी कमी केले ते अधिकार विद्यमान मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला परत बहाल करावेत अथवा विशेषाधिकार द्यावेत. तसे केले तर मुंबईसाठी स्वतंत्र सीईओ नेमण्याची गरजच उरणार नाही. मुळात मुंबई महानगरपालिकेची तिजोरी प्रशासकीय भार वाहून रिकामी होत आहे. त्यात वर्षानुवर्षे आदळणार्‍या लोंढ्यांचा भार दिवसागणिक वाढतच असून त्याचा असह्य ताण महापालिका पुरवीत असलेल्या किमान नागरी सेवासुविधांवर पडत आहे. त्यामुळेही महापालिकेच्या तिजोरीवरील बोजा वाढला आहे. 
 
- वास्तविक मुंबईतून केंद्राला वर्षाकाठी पावणेदोन लाख कोटी रुपये जातात. पण त्यातला किती भाग मुंबईच्या विकासाला परत मिळतो? म्हणजे त्यातील दमडीही द्यायची नाही आणि वर हे
‘सीईओ’सारखे प्रकार मुंबईच्या छाताडावर लादायचे. मुंबईतील उद्योजक, व्यापारी, बिल्डर वगैरेंना येथे फक्त पैसा आणि पैसाच दिसतो व राज्यकर्ते त्यांच्या कलाने वागत असतात; पण या मुंबईत मध्यमवर्गीय, गोरगरीब जनतादेखील राहते व त्यांच्या घरादारांचे, पाणी, आरोग्याचे प्रश्‍न आहेत व त्यासाठी नव्या राज्य सरकारने कोणत्या ठोस योजना आखल्या आहेत?
 
- विद्यमान मुख्यमंत्र्यांना राज्यात चांगले काम करायचे आहे, पण महाराष्ट्राच्या राजधानीविषयी निर्णय घेताना शिवसेनेसारख्या पक्षाचे मत विचारात घेतले तर बरे होईल. मुंबई देशाचे पोट भरते, पण मुंबईचे पोट कोण भरणार? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमच्या कायम शुभेच्छा आहेत. मात्र मुंबईचे शाप घेऊ नका, ही कळकळीची विनंती आहे.