शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसची प्रवाशांना धडक; अनेकजण जखमी
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

साखरेची किमान विक्री किंमत ठरवा

By admin | Updated: September 10, 2015 04:20 IST

केंद्र सरकारने ठरविलेल्या ‘एफआरपी’प्रमाणे उसाला दर देण्यास साखर कारखान्यांचा विरोध नाही; परंतु साखरेचे दर पडल्यानंतर साखरेची किमान विक्री किंमतही सरकारने ठरवावी,

पुणे : केंद्र सरकारने ठरविलेल्या ‘एफआरपी’प्रमाणे उसाला दर देण्यास साखर कारखान्यांचा विरोध नाही; परंतु साखरेचे दर पडल्यानंतर साखरेची किमान विक्री किंमतही सरकारने ठरवावी, अशी भूमिका साखर संघ व साखर कारखान्यांनी आज ऊस दर नियंत्रक मंडळाच्या बैठकीत सरकारसमोर मांडली आहे. त्यामुळे आता साखरेच्या किमान विक्री दराचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांच्या अध्यक्षतेखाली ऊस दर नियंत्रक मंडळाची आज मुंबईत बैठक झाली. या बैठकीला साखर आयुक्त डॉ. बिपीन शर्मा, खासदार राजू शेट्टी, साखर संघाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह सहकारी व खासगी कारखान्यांचे प्रतिनिधी तसेच शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. केंद्राने उसाच्या ‘एफआरपी’चा जो दर ठरविला आहे त्यापेक्षा अधिक भाव कारखाने देऊ शकत असतील तर तो दर ठरविण्याचा अधिकार या मंडळाला आहे; परंतु एफआरपीचा दर देणेच शक्य होत नसल्याने हा अधिकचा भाव ठरविण्याचा प्रश्नच राज्यात उद्भवत नाही, असा मद्दा बैठकीत उपस्थित झाला. एफआरपी देण्याबाबत साखर कारखान्यांनी बैठकीत सहमती दर्शविली. मात्र, एफआरपी द्यायचा कसा? हेही या मंडळाने कारखान्यांना सांगावे, असा मुद्या दांडेगावकर यांनी साखर संघाच्या वतीने उपस्थित केला. साखर कारखान्यांकडील जेवढी साखर विक्री होईल त्यापैकी ७० टक्के किंमत उसाला द्यावी, तर ३० टक्के रक्कम कारखान्यांचा खर्च भागविण्यासाठी वापरावी, असे रंगराजन समिती सांगते. उपपदार्थांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यांसाठी हे प्रमाण ७५-२५ टक्के आहे. मात्र, साखरेचे भाव इतके पडले आहे की याच गणिताची अंमलबजावणी केली तरी एफआरपी इतका भाव देणे शक्य नाही. अशावेळी कारखान्यांनी काय करायचे? त्यामुळे उसाचा दर जसा ठरतो तशीच साखरेची किमान विक्री किंमतही राज्य व केंद्राच्या या समित्यांनी ठरवावी, अशी मागणी साखर संघाने नोंदविली आहे. संघाच्या या भूमिकेस कारखान्यांनी समर्थन दिले आहे.