पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत दिल्या जाणाऱ्या २५ टक्के प्रवेशासाठीचे संकेतस्थळ बुधवारी पूर्ण दिवस डाऊन होते. त्यामुळे अनेक पालकांना आपले अर्जच भरता आले नाही. गुरुवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने आता पालकांमध्ये चिंतेचे वातावरण वाढले आहे. दरम्यान, आतापर्यंत १७ हजार १४८ पालकांनी अर्ज भरले असून, उद्या शेवटची तारीख असल्याने जास्त अर्ज भरली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया सुरूझाली आहे. प्रवेश अर्ज भरण्याची २८ एप्रिल हा शेवटचा दिवस आहे. मात्र, बुधवारी दिवसभर सर्व्हर डाऊन होता. त्यामुळे अनेकांना अर्जच भरता आले नाही. मुदतवाढ दिली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान, मुदतवाढीबाबत शिक्षण विभागाने कोणतीही माहिती दिली नाही.
आरटीई प्रवेशासाठीचे संकेतस्थळ सर्व्हर डाऊन
By admin | Updated: April 28, 2016 01:02 IST